घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCorona : १० ऑगस्ट..रशियाने केली Corona Vaccineची तारीख जाहीर!

Corona : १० ऑगस्ट..रशियाने केली Corona Vaccineची तारीख जाहीर!

Subscribe

गेल्या ७ महिन्यांपासून जगभरात ठाण मांडून बसलेल्या कोरोनाला हाकलून लावण्यासाठी आता जगभरात दीडशेहून अधिक संस्था कोरोनाच्या लसीवर संशोधन करत आहेत. आख्खं जग कोरोनाच्या लसीची प्रतिक्षा करत असताना रशियाने आता एक दावा केला आहे. येत्या १० ऑगस्टपूर्वी कोरोनाची लस बाजारात आणणार असल्याचं रशियन प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. सीएनएनच्या हवाल्याने न्यूज १८ने हे वृत्त दिलं आहे. असं झालं, तर ही जगातली पहिली कोरोना लस (First Vaccine of Coronavirus in the world) ठरेल. मात्र, त्याहून जास्त महत्त्वाचं म्हणजे जगाला कोरोनाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी ही लस जीवनदानाचं काम करेल. जगभरातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या १ कोटी ६५ लाख २३ हजार ८१५ इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा ६ लाख ५५ हजार ११२ इतका झाला आहे. त्यामुळे सगळ्यांनाच कोरोनाच्या लसीची प्रतिक्षा आहे.

लसीच्या चाचण्यांविषयी माहिती गुलदस्त्यात

सुरुवातीला रशियाकडून ही लस ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत म्हणजेच १५ ऑगस्टपर्यंत बाजारात आणण्याची तयारी केली गेली होती. मात्र, आता ती १० ऑगस्टपर्यंतच बाजारात येऊ शकते, असं रशियन वैज्ञानिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी लागणाऱ्या सरकारी स्तरावरच्या परवानग्यांसाठी काम सुरू असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, या लसीच्या किती पातळ्यांवर चाचण्या झाल्या आहेत आणि त्या किती यशस्वी ठरल्या आहेत, याविषयी मात्र अद्याप पूर्ण माहिती मिळू शकलेली नाही.

- Advertisement -

कोरोना योद्ध्यांना आधी देणार लस

ही लस बाजारात आल्यानंतर सामान्य नागरिकांच्या आधी डॉक्टर, नर्स अशा आरोग्य व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना ती दिली जाणार आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सक्षमपणे कोरोनाचा सामना करू शकेल आणि त्यांच्या उत्साह देखील वाढेल, असं रशियन वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. दरम्यान, रशियाने स्पुटनिक उपग्रह सर्वात आधी अंतराळात सोडल्यानंतर अमेरिकेला धक्का बसला होता, त्याचप्रमाणे कोविड-१९वरची (Covid-19) लस रशियाने सर्वात आधी बाजारात आणल्यानंतर अमेरिकेला धक्का बसेल असं देखील या वैज्ञानिंकाचं म्हणणं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -