घरटेक-वेकही छोटीशी 'चिप' वाढवणार तुमची बुद्धी

ही छोटीशी ‘चिप’ वाढवणार तुमची बुद्धी

Subscribe

जगभरातील माणसांच्या वैचारिक क्षमतेमध्ये वाढ व्हावी आणि पर्यायाने भविष्यात अधिक चांगली प्रगती करावी, या उद्देशाने ही चिप बनवत असल्याचं डॉ. सेर्फ सांगतात.

मानव जातीच्या हितासाठी जगभरातील संशोधक नेहमीच काही ना काही आविष्कार करत असतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने संशोधक तसंच शास्त्रज्ञ माणसाला लाभदायक ठरतील अशा उपकरणांची निर्मिती करत असतात. आजवर अशा एकाहून एक उत्तम गॅजेट्सची जगभरात निर्मीती केली गेली आहे. याच धर्तीवर आता माणसाची बौद्धिक क्षमता वाढावी यादृष्टीने एक महत्वाचं संशोधन करण्यात आलं आहे. अमेरिकेतील काही तज्ज्ञ ‘स्मार्ट चिप’ नामक एक भन्नाट गॅजेटची निर्मिती करत आहेत. ही हाय-टेक चिप थेट माणसाच्या मेंदून प्रत्यारोपित केली जाऊ शकेल. या ‘स्मार्ट चिप’च्या साहाय्याने माणसाच्या मेंदूची बौद्धिक क्षमता काही पटीने वाढवली जाऊ शकते, असा निर्मात्यांचा दावा आहे.

ही आगळी-वेगळी पण माणसासाठी तितकीच फायदेशीर अशी ‘स्मार्ट चिप’ तयार करण्याचं काम, नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीचे न्यूरोसायंटिस्ट डॉ. मोरॉन सेर्फ करत आहेत. जगभरातील माणसांच्या वैचारिक क्षमतेमध्ये वाढ व्हावी आणि पर्यायाने मानव जातीने भविष्यात अधिक चांगली प्रगती करावी, या उद्देशाने ही चिप बनवत असल्याचं डॉ. सेर्फ सांगतात.

- Advertisement -

‘स्मार्ट चिप’ कसं काम करेल?

डॉ. मोरॉन सेर्फ यांना ‘टेस्ला’ आणि ‘स्पेस एक्स’च्या एलन मस्क यांनी ‘ब्रेन कॉम्प्युटर’ची संकल्पना मांडल्यानंतर, अशाप्रकारची भन्नाट चिप बनवण्याची कल्पना सुचली. मेंदूत बसवलेली ही चिप इंटरनेटशी जोडलेली असेल. त्यामुळे जगातील सर्व प्रकारची माहिती इंटरनेटच्या साहाय्याने मेंदूला पुरवली जाईल. त्यामुळे कोणताही प्रश्‍न विचारल्यावर त्याचे तत्काळ उत्तर संबंधित माणूस देऊ शकेल. सहसा माणसाला एखाद्या गोष्टीचं उत्तर मिळवण्यासाठी बराच वेळ आणि शक्‍ती खर्च करावी लागते. मात्र, ही चिप त्याचा हाच वेळ वाचवू शकते, असं डॉ. सेर्फ म्हणतात. सध्या या चिपच्या निर्मितीवर वेगाने काम सुरु असून, येत्या पाच वर्षांच्या काळात ची ‘स्मार्ट चिप’ वापरासाठी तयार होईल, असं डॉ सेर्फ यांचं मत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -