Coronavirus – तर भारतात ३ लाख करोनाग्रस्त, वैज्ञानिकांचा इशारा!

१५ मे पर्यंत ही परिस्थीती अशीच राहील्यास करोनाग्रस्तांची संख्या ३ लाखांवर जाईल असा अहवाल या वैज्ञानिकांनी दिला आहे.

Delhi
corona patients

भारतात करोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. पण तरीही हळूहूळू का होईना करोनाचा फैलाव होत आहे. जर भारतात करोनाचा फैलाव सुरूच राहीला तर मे महिन्यापर्यंत करोनाग्रस्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊ शकते असा अंदाज आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. कोव्ह-इंड १९ या टीमने हा धक्कादायक अंदाज व्यक्त केला आहे. या टीममध्ये अमेरिका आणि भारतासह अनेक देशांच्या वैज्ञानिकांचा समावेश आहे. त्यांनी दिलेला एक अहवाल समोर आला आहे.

अमेरिका, चीन, इराण, स्पेनच्या तुलनेत भारताने करोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलं आहे. भारतात स्टेज २ ला करोनाला असताना कठोर पावलं उचलत लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र तरीही दररोज राज्यात ९ ते १० करोनाबाधीत रूग्ण सापडत आहेत. त्यामुळे १५ मे पर्यंत ही परिस्थीती अशीच राहील्यास करोनाग्रस्तांची संख्या ३ लाखांवर जाईल असा अहवाल या वैज्ञानिकांनी दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित केला आहे. त्यांनी हेदेखील म्हटलं होतं की आपण लॉकडाउनचे नियम पाळले नाहीत तर आपला देश २१ वर्षे मागे जाईल. पण तरीही नागरिक अद्याप हे नियम पाळताना दिसत नाहीयेत. जर नागरिक असेच बाहेर पडत राहीले तर करोना तिसऱ्या स्टेजला प्रवेश करू शकतो.

भारत मेडिकलदृष्ट्या सक्षम नाही

भारतात एक हजार लोकांमागे एक आयसोलेशन बेड नाही ही देखील चिंतेची बाब आहे. फ्रान्स, दक्षिण कोरिया, चीन, इटली आणि अमेरिका या देशांच्या तुलनेत भारतात आयसोलेशन बेड्सची संख्या अगदीत नगण्य आहे. ही चिंतेची बाब आहे असंही वैज्ञानिकांनी म्हटलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here