घरदेश-विदेश'आज दंगलीत माझे वडील गेले, उद्या कुणाचे वडील जातील?'

‘आज दंगलीत माझे वडील गेले, उद्या कुणाचे वडील जातील?’

Subscribe

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यात गोहत्या संशयावरुन उफाळलेल्या दंगलीत एका पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. यानंतर शहिद पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलाने आज दंगलीत माझे वडील गेले, उद्या कुणाचे वडील जातील?, असा सवाल केला आहे.

गोहत्येच्या संशयावरुन उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथे झालेल्या दंगलीत एका पोलीस उपनिरिक्षकांचा मृत्यू झाला आहे. सुबोध कुमार सिंह असे या पोलीस उपरनिरिक्षकाचे नाव आहे. सिंह यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा अभिषेक यांनी तेथील लोकांना प्रश्न विचारला आहे. हिंदू आणि मुस्लीम समाजाच्या दंगलीत माझ्या वडिलांचा मृत्यू झाला, उद्या कुणाच्या वडिलांचा जीव जाईल? असा प्रश्न अभिषेकने केला आहे. सध्या बुलंदशहरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुठलाही गैरप्रकार घडू नये, याची काळजी पोलीस प्रशासन घेत आहे. शिवाय, या दंगलीप्रकरणी ८७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – राम मंदिरावरुन देशात दंगली घडवण्याचे कारस्थान – राज ठाकरे

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण?

बुलंदशहर जिल्ह्यातील एका गावात शेतामध्ये मृत गायीचे अवशेष सापडले. त्यामुळे काही लोकांनी गोहत्या करण्यात आली असल्याची माहिती सगळीकडे पसरवली. ही बाब माहित पळताच संतप्त झालेल्या जमावाने रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाला थांबवण्यासाठी घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलीसांनी या आंदोलकांना रस्त्यावरुन बाजू होण्यास सांगितले. परंतु, पोलिसांच्या कुठल्याही गोष्टी आंदोलकांनी एकल्या नाहीत. त्यामुळे पोलीस आणि आंदोलक दोघांमध्ये वादावादी झाली. जमाव पोलीसांवर चालून गेला. अखेर पोलसांना जमावावर गोळीबार करावा लागला. या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाला. त्यानंतर या जमावाने पोलिस ठाण्यावर हल्ला केला. त्यांनी पोलीस ठाण्याची तोडफोड आणि जाळपोळ केली. जमावाने केलेल्या या हल्यात पोलीस उपनिरिक्षक सुबोध कुमार सिंह यांचा मृत्यू झाला. या दंगलीत आपल्या वडिलांना गमवणारा अभिषेक माध्यमांशी बोलताना म्हणाला की, माझे वडील मला समाजात एक चांगला नागरीक बनवू इच्छित होते. कुठल्याही धर्माच्या नावाने हिंसाचार न करणारा नागरीक ते मला बनवू इच्छित होते. परंतू, आज हिंदू-मुस्लिम दमगलीमुळे माझ्या वडिलांना प्राण गमवावा लागला. आज या दंगलीत माझे वडील गेले, अद्या आणखी कुणाचे वडील जाणार आहेत? असा सवालही अभिषेकने समाजाला विचारला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – १९८४ दंगली प्रकरणी ८८ जणांविरोधात आरोप निश्चित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -