घरदेश-विदेशशशी थरूर यांच्या पुस्तकावर आधारीत वेब सीरीजची निर्मिती

शशी थरूर यांच्या पुस्तकावर आधारीत वेब सीरीजची निर्मिती

Subscribe

काँग्रेस नेता शशी थरूर यांच्या 'व्हाय आय एम ए हिंदू' या पुस्तकावर वेब सीरीज बनवण्यात येणार आहे. शशी थरूर यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट करत ही माहिती दिली.

काँग्रेस नेता आणि लेखक शशी थरूर यांच्या ‘व्हाय आय एम ए हिंदू’ या पुस्तकावर वेब सीरीज बनवण्यात येणार आहे. शशी थरूर यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट करत ही माहिती दिली. या वेब सीरीजची निर्मिती राष्ट्रीय पुरस्कार विजेते शीतल तलवार करणार असून थरूर स्वतः या शोचे नरेशन करणार आहेत. या वेब सीरीजच्या माध्यमातून तब्बल सात वर्षांनंतर शीतल तलवार चित्रपट निर्मिती क्षेत्रात येत आहेत. यापूर्वी त्यांनी २०११ साली मौसम चित्रपटाची निर्मिती केली होती. नुकतेच या वेब सीरीजचा प्रोमो लाँच करण्यात आला आहे. तर २०१९ साली ही वेब सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देशातील विविध भाषांमध्ये ही वेब सीरीज बनवण्यात येणार आहे. शशी थरूर यांनी लिहिलेले ‘व्हाय आय एम ए हिंदू’ हे पुस्तक चांगलेच चर्चेत राहीले होते.

काय आहे पुस्तकात

हिंदू धर्मातील वर्तमान काळाची व्याख्या आणि त्याचा दुरुपयोग याबाबत ‘व्हाय आय एम ए हिंदू’ या पुस्तकात माहिती देण्यात आली आहे. त्याशिवाय त्यांनी हिंदू धर्मातील सामाजिक-सांस्कृतिक विकासाच्या संदर्भातही भाष्य करण्यात केले आहे. पुस्तकावर आधारीत वेब सीरीज बनवण्याबाबत शशी थरूर यांनी म्हटले आहे की, “कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही काळात या पुस्तकावर चित्रपट बनवणे काळानुरूप ठरेल. मात्र सद्यस्थितीतील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती पाहता खऱ्या हिंदू धर्माचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.”

- Advertisement -

शशी थरूर यांच्यावर आरोप 

शशी थरूर यांच्याविरोधात सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली सुरू आहे. सुनंदा पुष्कर यांचा १७ जानेवारी २०१४ रोजी दिल्लीतील लीला हॉटेलच्या बाथरूममध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. मृत्यूपूर्वी त्रिवेदम ते दिल्ली विमान प्रवासात सुनंदा पुष्कर आणि शशी थरूर यांच्यात भांडण झाले होते. तसेच दिल्ली विमानतळावर देखील दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. भांडणानंतर सुनंदा पुष्कर यांनी स्व:ताला हॉटेलच्या बाथरूममध्ये ४५ मिनिटे कोंडून घेतले होते. विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर केलेल्या चौकशीनंतर पोलिसांनी शशी थरूर यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -