घरCORONA UPDATECoronavirus: तंबाखूचे सेवन-धुम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा जास्त धोका - WHO

Coronavirus: तंबाखूचे सेवन-धुम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा जास्त धोका – WHO

Subscribe

जगभरात कोरोना व्हायरसचा धोका वाढत असताना आता एक नवीन गोष्ट समोर आली आहे. कोरोना विषाणूनचा बारकाईने अभ्यास करणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) काही निरीक्षणे मांडली आहेत. त्यापैकीच धुम्रपान आणि तंबाखू सेवन करणाऱ्या लोकांना कोरोनाचा धोका अधिक असल्याचे WHO च्या संशोधकांनी सांगितले आहे. कोरोनाने आता १९५ पैकी १९० देशांमध्ये शिरकाव केलेला आहे. सहा लाखाहून अधिक रुग्ण कोरोनाबाधित झाले असून २८ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

WHO चे मत काय आहे?

जागतिक आरोग्य संघटेचे संशोधक सांगतात की, इतर रुग्णांच्या तुलनेत धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींकडून कोरोनाचे संक्रमन अधिक वेगाने होते. सिगारेट किंवा विडी ही बोट आणि तोंडाच्या थेट संपर्कात येते. यामुळे कोरोनाचा फैलाव जास्त होऊ शकतो. त्यासोबतच हुक्का, सिगार किंवा ई-सिगरेट पिणाऱ्या व्यक्तिंनाही कोरोनाचा धोका अधिक असल्याचे सांगण्यात येते.

- Advertisement -

दरम्यान अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ड्रग्ज अब्युजच्या संचालिका डॉ. नोरा वॉलकोव यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस हा थेट फुफ्फुसावर हल्ला करतो. त्यामुळे धुम्रपान करणाऱ्या लोकांना याचा जास्त धोका आहे. धुम्रपानामुळे फुफ्फुसांच्या कोशिका कमजोर पडतात. ज्यामुळे इनफेक्शनसोबत लढण्याची त्यांची ताकद उरलेली नसते.

धुम्रपान किंवा तंबाखू सेवन हा धोका असल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप यामुळे किती लोक बाधित झाले आहेत, याची निश्चित आकडेवारी समोर आलेली नाही. मात्र महामारीच्या या चक्रव्यूहात विशेषज्ञ मात्र धुम्रपान आणि तंबाखूपासून लांब राहण्याचा सल्ला देत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -