घरताज्या घडामोडीयुक्रेनचं विमान पाडल्याप्रकरणी इराणची कारवाई!

युक्रेनचं विमान पाडल्याप्रकरणी इराणची कारवाई!

Subscribe

याप्रकरणी इराणमध्ये कारवाई करण्यात आली आहे. इराणमधील काही जणांना अटक केल्याची माहिती इराणच्या न्यायसंस्थेकडून देण्यात आली आहे.

इराकमधील अमेरिकेच्या दोन तळांवर इराणने काही दिवसांपूर्वी हल्ला केला. दरम्यान तेव्हा अपघाताने युक्रेनचं एक प्रवासी विमान पाडण्यात आलं होतं. या घटनेत विमानातील १७६ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. याप्रकरणी इराणमध्ये कारवाई करण्यात आली आहे. इराणमधील काही जणांना अटक केल्याची माहिती इराणच्या न्यायसंस्थेकडून देण्यात आली आहे.

अटक केलेल्यांची नावे गुलदस्त्यात

युक्रेनच्या प्रवासी विमान दुर्घटनेची जबाबदारी घेत इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी याप्रकरणी विमान कसे पाडले? यासाठी विशेष कोर्ट स्थापून चौकशी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार कारवाईला वेग आला. याप्रकरणी तपास सुरू करण्यात येवून मिळालेल्या माहितीनुसार काही जणांना अटक करण्यात आली आहे. पण याप्रकरणी किती जणांना अटक करण्यात आली. तसेच त्यांची नावं याबाबत कोणतीच माहिती इराणच्या न्यायसंस्थेकडून देण्यात आलेली नाही.

- Advertisement -

सुनावणीकडे जगाचे लक्ष

दरम्यान सुरूवातीला इराणने युक्रेनचं प्रवासी विमान दुर्घटनेची जबाबदारी फेटाळली होती. पण त्यानंतर काही दिवसांनी विमान पाडल्याचा आरोप इराणने मान्य केला होता. त्यामुळे संपूर्ण जगाचे या कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -