नवरात्रीच्या निमित्ताने पुढचे २१ दिवस ९ गरीब कुटुंबांची जबाबदारी घ्या; मोदींचे आवाहन

Kashi
pm narendra modi announcment kashi

“करोना विरोधात लढाई करण्यासाठी केंद्राकडून व्यापक उपाययोजना केल्या जात आहेत. करोना व्हायरस आपल्या संस्कृती आणि संस्कारांना नष्ट करु शकत नाही. कोरोना विरोधीत लढाई करायची असेल तर मनात करुणा भाव ठेवायला हवा. गरिबांना मदत करताना करुणा भाव दाखवला तर करोना आपले काहीच करु शकत नाही”, असे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा जनतेला संदेश दिला आहे. “आजपासून नवरात्र सुरु होत आहे. मी देशातील सधन नागरिकांना आवाहन करतो की, प्रत्येक भारतीयाने पुढचे २१ दिवस नऊ गरिब परिवारांना सांभाळावे. जर तुम्ही एवढे करु शकलात, तर ही पक्की नवरात्री होईल”, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

आज देशभरात चैत्र नवरात्रीचा उत्सव साजरा केला जात आहे. चैत्र नवरात्रीचा आज पहिला दिवस असून त्या पार्श्वभूमीवर मोदींनी हे मदतीचे आवाहन केले. काशीमधील नागरिकांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधत असताना मोदी म्हणाले की, “गरीबांसोबतच आपल्या आजुबाजुला जे पशु-पक्षी आहेत त्यांचीही काळजी नागरिकांनी घ्यावी. कारण लॉकडाऊन मुळे पशु-पक्ष्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.”

ते पुढे म्हणाले की, “आज आपल्या दुःखाची सीमा फक्त २१ दिवस आहे. पण या २१ दिवसांत आपण काळजी घेतली नाही, तर हे दुःख आणखी काही काळ वाढू शकते. आज आरोग्य सेवा देणारे कर्मचारी दोन ते तीन तास फक्त झोप घेऊन रुग्णालयात १८ तास काम करत आहेत. अशा कठीण काळात या सर्वांना आपण नमन करायला हवे. हॉस्पिटलमध्ये काम करणारे, पोलीस, माध्यमातील लोक हे आपल्याच देशातील लोक आहेत, ते आपल्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे त्यांना सहकार्य करा, असे आवाहनही मोदींनी केले.

LIVE Interacting with citizens of Kashi.

LIVE Interacting with citizens of Kashi.

Narendra Modi ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಮಾರ್ಚ್ 25, 2020

 

यावेळी मोदींनी करोनासाठी एक हेल्पलाईन नंबर देखील सांगितला. हा नंबर WhatsApp ला जोडलेला असून यावर फक्त नमस्ते असा मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला समोरुन मेसेजेस यायला सुरुवात होईल. हा नंबर आहे ९०१३१ ५१५१५.

तसेच करोनाला घाबरण्याची गरज नसून या आजारापासून जवळपास १ लाख लोक जगभरात बरे झाले आहेत. तर भारतात देखील अनेकजण या विषाणूच्या धोक्यातून बाहेर आले आहेत, असेही मोदींनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here