पुरूषांच्या आर्मी पथकाचं नेतृत्व करणारी रणरागिणी

कॅप्टन तानिया शेरगील

Mumbai
tania shergil

बुधवारी पार पडलेल्या 72 व्या सैन्य दिवशी आर्मी डे परेडचे नेतृत्त्व कॅप्टन तानिया शेरगिल यांनी केले. आर्मी डेचे परेड नेतृत्त्व एखाद्या महिला अधिकार्‍याने करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सैन्यात दाखल होऊन देशाची सेवा करणार्‍या तानियांची ही चौथी पिढी आहे. तानिया शेरगिल या प्रजासत्ताक दिवसाच्या परेडमध्येही सैन्याच्या पथकाचे नेतृत्त्व करणार आहेत. याआधी म्हणजेच मागील वर्षी कॅप्टन भावना कस्तुरी या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सर्व पुरुषांचे नेतृत्त्व करणार्‍या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या होत्या. दिल्लीच्या कँट परिसरातील आर्मी परेड ग्राऊंडमध्ये हे संचलन झाले. या निमित्ताने लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या हस्ते अनेक जवानांना सन्मानित करण्यात आले.

तानिया शेरगिल या सैन्याच्या सिग्नल कोरमध्ये कॅप्टन आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन्समध्ये बीटेक केल्यानंतर तान्या यांनी सैन्यात सामील होण्याचा निर्णय घेतला. 2017 मध्ये चेन्नईमध्ये ऑफिसर ट्रेनिंग अकादमीतून प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या सैन्यात दाखल झाल्या.

चौथी पिढी सैन्यात
सैन्यात दाखल होणार्‍या तानिया त्यांच्या कुटुंबातील चौथी पिढी आहे. त्यांचे वडील सैन्याच्या 101 मीडियम रेजिमेंट तोफखाना (आर्टिलरी), आजोबा चौदाव्या सशस्त्र रेजिमेंट (सिंडी होर्स) आणि पणजोबा शिख रेजिमेंटमध्ये पायदळ सैनिक (इन्फ्रंट्री) म्हणून सेवा केली आहे. तानिया शेरगिल यांना देशसेवा आणि सैनिकी शिस्त वारसाहक्कानेच मिळाली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here