घरदेश-विदेशया कारणामुळे गमावली ९ अरब डॉलर्सची संपत्ती

या कारणामुळे गमावली ९ अरब डॉलर्सची संपत्ती

Subscribe

अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना आता पर्यंतचे सर्वात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी खूप वेळ लागेल.

अमेरिकेत शेअर बाजार घसल्याचा फटका अनेक कंपन्यांना लागला आहे. यामुळे अनेकांनी आपले लाखो डॉलर्स गमावले. यात अॅमेझॉनचे संस्थापक आणि जागातिल सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे जेफ बेझोस यांच्या कंपनीने ९ .१ अरब डॉलर्स गमावले आहेत. हे नुकसाना आतापर्यंतचे सर्वात मोठे आर्थिक नुकसान असल्याचे सांगितल्या जातेयं. बुधवारी अमेरिकेच्या शेअर बाजारात टेक शेअर्सचा भाव अचानक घसरला. याचा फटका ८०० हून अधिक कंपन्यांना बसला. टेक शेअर्समध्ये सर्वात जास्त नुकसान अॅमेझॉन आणि नेटफ्लिक्स यांना पडला. अॅमेझॉनचा शेअर ६.१५ अंकाने कोसळला असून शेअर्सची किंमत १ हजार ७५५.२५ डॉलर्स येवढी झाली. बेजोस हे कंपनीचे संस्थापक आहेत. आतापर्यंत शेअर बाजारातील घसरणीमुळे त्यांची संपत्ती १४४.७ अरब डॉलर्सने कमी झाली. ऑक्टोबर महिन्यात अॅमेझॉनच्या स्टॉक १३.२% कमी झाले आहेत. जगातील २० श्रीमंत व्यक्तींपैकी ६ टेक कंपनींच्या मालकांनाही मोठ नुकसान सहन करवे लागले आहे.

अजून कोणला बसला फटका?

अमेरिकेच्या टेक शेअर बाजाराला बुधवारी उतरती कळा लागली. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या उत्पन्नाचे साधन असलेले शेअर बाजार ढासळले. अॅमेझॉन बरोबरच नेटफ्लिक्स, गुगल आणि अॅपल या मोठ्या कंपन्यांनाही मोठं नुकसान सहन कराव लागले. बिल गेट्स आणि मार्क झकेरबर्ग यांच्याबरोबर ६७ श्रीमंत व्यक्तींनी अरबो डॉलर्स गमावले.

- Advertisement -
screen shot 2018-10-11 at 092515
नुकसान झालेल्या श्रीमंताची यादी

जेफ बेझोस यांना २०१८ मध्ये फोर्ब्स मॅगझिन जगातील ४०० श्रीमंत लोकांमध्ये सामील केले होते. त्यांची एकूण संपत्ती ची नेट किंमत १६० अरब डॉलर्सची आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -