घरट्रेंडिंगVIDEO: स्वातंत्र्य दिनानिमित्त माहीची झीवा बनली झांसीची राणी

VIDEO: स्वातंत्र्य दिनानिमित्त माहीची झीवा बनली झांसीची राणी

Subscribe

झीवाचा एक व्हिडिओ स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी चांगलाच चर्चेत

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि त्याची मुलगी झीवा हिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आसतात. नुकताच झीवाचा एक व्हिडिओ स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी चांगलाच चर्चेत आला आहे. महेंद्र सिंह धोनी आणि त्याची मुलगी झीवा नेहमीच सोशल मीडियावर ॲक्टिक असतात.

- Advertisement -

Mahendra Singh Dhoni's daughter Ziva Dhoni, Ziva Dhoni, Ziva Dhoni becomes Rani of Jhansi Ziva Dhoni dressed as Rani of Jhansi, Ziva Dhoni Independence Day Video,महेंद्र सिंह

भारत देशात आज ७३ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत आहे. महेंद्र सिंह धोनीची मुलगी झीवाच्या शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त नृत्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात झीवाने सहभाग घेतला होता. झीवासोबत अनेक लहान मुलांनी सहभाग घेतला होता.

- Advertisement -

यामध्ये विविध पोषाख मुलांनी परिधान केले आहेत. कोणी महात्मा गांधी बनून आले आहे तर काहींनी जवाहर लाल नेहरूंची वेशभूषा परिधान केली आहे. मात्र, धोनीची झीवा झांसीची राणी बनल्याचे दिसते. या फोटोमध्ये झीवाच्या एका हातात तलवार, दुसऱ्या हातात ढाल, डोक्यावर पगडी घातल्याचे दिसते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -