घरदेश-विदेशसततच्या चुकीला माफी नाही!

सततच्या चुकीला माफी नाही!

Subscribe

कारगिलसारख्या युद्धात धडा शिकवूनही पाकिस्तानची खुमखुमी उतरलेली नाही. अतिरेक्यांना तो देश केवळ मानसिकच नव्हेतर आर्थिक पाठबळ देऊन भारताच्या कुरापती काढतो आहे. अशा कुरापती लागलीच थांबतील अशी अपेक्षा आहे. असल्या चुकांना सतत माफी नाही. अशी आगळीक पुन्हा घडली तर चुकीला माफी नाही. जशास तसे उत्तर हीच कृती असेल, असा इशारा लष्करप्रमुख बिपिन रावर यांनी पाकिस्तानला दिला.

२०व्या कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित सोहळ्याप्रसंगी लष्करप्रमुख पत्रकार परिषदेत बोलत होते. अनेक घटनांनी पाकिस्तानला आमच्या जाँबाज सैनिकांनी धडा शिकवला. पण त्यांना अजून अक्कल आलेली दिसत नाही. कुरापती अजून सुरूच आहेत. १९९९च्या लढ्यात ते काही शिकले असे दिसत नाही. हा लढा आमच्यासाठी अभिमानाचा आणि देशाची अखंडता टिकवणारा होता. ही अखंडता कोणी मोडण्याचा प्रयत्न केला तर त्याची धडगत नाही, असे लष्कर प्रमुखांनी स्पष्ट केले. २६ जुलै १९९९ या दिवशी सैन्याने कारगिलमध्ये घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैन्याला कायमची अद्दल घडवली.

- Advertisement -

सुमारे अडीच महिने चाललेल्या या ‘ऑपरेशन विजय’मध्ये देशाने ५२७ पेक्षा अधिक वीर योद्धे गमावले. तर १३०० पेक्षा जास्त जवान जखमी झाले. आज संपूर्ण देशभरात कारगील विजय दिवस साजरा केला जात असून शहिदांना आदरांजली वाहिली जात आहे. लष्कर, हवाई आणि नौदलाच्या प्रमुखांनी देखील शहिदांना आदरांजली वाहिली.

यावेळी लष्करप्रमुख बिपीन रावत यांना कारगील विजय दिवसनिमित्त पाकिस्तानला काय संदेश देणार, असे विचारले. तेव्हा ते म्हणाले, पुन्हा असा प्रयत्न करु नका, एकदा चुकीला माफी असते सतत असा प्रयत्न केलात तर याद राखा, सहसा पुन्हा चुकीला माफी नाही, अशा शब्दांत बिपिन रावत यांनी ठणकावले. पाकिस्तान पुन्हा असा बालिशपणा करेल असे वाटत नसल्याचेही ते म्हणाले. त्यांना आता त्यांची ताकद कळली आहे, असे ते म्हणाले.

- Advertisement -

आमच्या सिद्धतेचा अंदाज कोणी घेऊ नये. कोणी चिंता करू नका. पण आमच्या वाट्याला अकारण जाणार्‍यांची गय नाही. आमचे जवान सीमारेषेची सुरक्षा करत आहेत. कितीही मोठी जबाबदारी असली तरी देशवासीयांनी निश्चिंत राहावे. कुठल्याही प्रसंगाला आम्ही सडेतोड उत्तर देऊ शकतो, हे जगाला ठावूक आहे. आमचा ताफा अधिक शस्त्रसज्ज होत आहे. आता आपल्याकडे आधुनिक शस्त्रास्त्रे व साधनसामग्री असून घुसखोरी करणार्‍यांची माहिती मिळवू शकतो, अशी माहिती त्यांनी दिली होती.

काश्मिरी तरुणांना समजावू
बोफोर्स तोफा आता भारतातच बनवल्या जाणार आहेत आणि एल अँड टी कंपनी त्यात पुढाकार घेत असल्याचे रावत म्हणाले. काश्मीर ही भारत भूमी आहे. पाकव्याप्त काश्मीर हा विषय राजकीय असला तरी तो सोडवावा लागेल, असे एका प्रश्नावर त्यांनी नमूद केले. अतिरेकी संघटनांमध्ये सामील होणार्‍या काश्मिरी तरुणांना समजावण्याचा आमचा प्रयत्न सुरूच राहील. पण हातात शस्त्र घेऊन ते सैन्यावर चालवणार्‍यांची गणती अतिरेक्यांमध्येच होईल, असे रावत यांनी स्पष्ट केले.

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -