राष्ट्राध्यक्ष पद गेल्यानंतर ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, जाणार जेलमध्ये!

राष्ट्राध्यक्ष पद गेल्यानंतर ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, जाणार जेलमध्ये!

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा निकाल शनिवारी (७ नोव्हेंबर २०२०) रात्री लागला असून अमेरिकेच्या जनतेने जो बायडेन यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले आहे. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला आहे. ते दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनू शकले नाही आहेत. यानंतर आता ट्रम्प यांच्या अडचणी वाढणार असल्याचे समोर आले आहे. राष्ट्राध्यक्ष पद गेल्यानंतर ट्रम्प जेलमध्ये जाऊ शकतात, असे म्हटले जात आहे.

बीबीसीच्या वृत्तानुसार, विशेष तज्ज्ञांच्या मते, त्यांच्या कार्याकाळात झालेल्या घोटाळ्यांच्या चौकशीत असे समोर आले की, राष्ट्राध्यक्ष पद गेल्यानंतर ट्रम्प यांना गुन्हेगारी कारवायांव्यतिरिक्त कठीण आर्थिक परिस्थितीलाही सामोरे जावे लागू शकते. दरम्यान राष्ट्राध्यक्ष पदावर असताना त्यांच्या विरोधात अधिकृत कामासाठी खटला चालविला जाऊ शकत नाही. पण आता त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

पेस न्युनिव्हर्सिटीमधील घटनात्मक कायद्याचे प्राध्यापक बेनेट गर्शमॅन म्हणाले की, ‘डोनाल्ड ट्रम्प यांच्या फौजदारी खटल्यांची सुनावणी घेण्याची शक्यता आहे.’ प्राध्यापक बेनेट गर्शमॅम यांनी दशकासाठी न्यूयॉर्कमध्ये अभियोक्ता म्हणून काम केले आहे. गर्शमॅन म्हणाले की, ‘ट्रम्प यांच्यावर बँक घोटाळा, कर घोटाळा, मंडी लाँड्रिंग, निवडणूक घोटाळा यासारख्या प्रकरणात आरोप लावले गेले आहेत. त्याच्या कामांशी संबंधित काही माहिती मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहे ते आर्थिक आहे.’

एवढीच प्रकरणे नाही आहेत. अमेरिकेतील मीडियाच्या वृत्ताच्या माहितीनुसार, ‘डोनाल्ड ट्रम्प यांना प्रचंड आर्थिक तूट सहन करावी लागू शकते. यात मोठ्या प्रमाणात वैयक्तिक कर्ज आणि त्यांच्या व्यवसायातील अडचणींचा समावेश आहे.’ न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, ‘पुढील चार वर्षात ट्रम्प यांना ३० कोटी डॉलरहून अधिक कर्ज फेडायचे आहे, ज्यावेळी त्यांची खासगी गुंतवणूक फार चांगली स्थितीत नाही आहे. तसेच ते सध्या राष्ट्राध्यक्ष नसल्याने कर्जाच्या देयकाबाबत कर्जपुरवठादार सहानुभूती दाखवण्याची शक्यता कमी आहे.’

जेव्हा डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा त्यांच्याभोवती कायदेशीर आणि आर्थिक अडचणींसाठी सुरक्षा कवच होते. पण आता ते नाहीस झाले असल्यामुळे ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष पदावर असताना ट्रम्प यांच्या करण्यात आलेले आरोप स्पष्टपणे नाकारले आहेत. तसेच त्यांच्या प्रशासनावर करण्यात आलेले आरोप या वर्षाच्या सुरुवातीलच महाभियोगबद्दल न्याय विभागाने चौकशी करून ते निर्दोष मुक्त झाल्याचे ट्रम्प म्हणाले आहेत.


हेही वाचा – जो बायडेन आणि कमला हॅरिस यांचा शपथविधी २० जानेवारीला होणार