घरदेश-विदेशउन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेला जाळण्याचा प्रयत्न; पीडित तरुणी ९० टक्के भाजली

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेला जाळण्याचा प्रयत्न; पीडित तरुणी ९० टक्के भाजली

Subscribe

उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये बलात्कार केलेल्या नराधमांकडूनच पीडित तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. उन्नाव बलात्कारातील पीडितेसोबत हा घृणास्पद प्रकार घडला आहे. यामध्ये पीडित तरुणी ९० टक्के भाजली आहे. कोर्टाच्या सुनावनीला पीडित तरुणी जात होती. त्यावेळी हा सर्व प्रकार घडला असल्याचे समोर येत आहे. उन्नाव बलात्कार प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी ३ जणांना अटक केली असून दोघांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. २०१७ मध्ये पीडितेवर बलात्कार झाला होता.


हेही वाचा – उन्नाव बलात्कार प्रकरण – आरोपी कुलदिप सेनगरच्या भावाचा मृत्यू

- Advertisement -

काय उन्नाव बलात्कार प्रकरण?

भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंह सेंगरने काही साथीदाऱ्यांसह पीडितेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणामुळे संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्य केली गेली होती. या पीडितेने आपल्याला न्याय मिळावा यासाठी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आत्मदहनाचा देखील प्रयत्न केला होता. त्यानंतर भाजपने या आमदाराची पक्षातून देखील हकालपट्टी केली होती. तेव्हापासून कोर्टात याप्रकरणी सुनावणी सुरु होती. दरम्यान, आज कोर्टात सुनावणीसाठी जात असताना पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेला. यात पीडित तरुणी ९० टक्के भाजली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा – उन्नाव बलात्कार : आरोपी भाजप आमदाराची पक्षातून हकालपट्टी

- Advertisement -

कुलदिप सिंह बांगरमऊ मतदारसंघामधून भाजपचे आमदार होता. त्याने साथीदारांसह बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला होता. त्यानंतर पीडितेने मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न देखील केला होता. याचदरम्यान शस्त्रास्त्र कायद्याखाली अटकेत असलेल्या पीडितीच्या वडिलांचा पोलीस कोठडीतच संशयितरित्या मृत्यू झाला होता. या संपूर्ण प्रकरणामुळे योगी सरकारवर कारवाईसाठी दबाव वाढला होता. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही नोटीस बजावल्यानेही आदित्यनाथ सरकारसमोरच्या अडचणी वाढल्या होत्या. यानंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करण्यात यावी, अशी शिफारस देखील योगी सरकारने केंद्राकडे केली होती. प्रकरण संवेदनशील असल्याने पंतप्रधान कार्यालयाने देखील त्याची गंभीर दखल घेत प्रकरण सीबीआय चौकशीला मंजुरी दिली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. याप्रकरणी आता सीबीआयने भाजप आमदार कुलदीप सिंह यांच्यासह पाच जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर पक्षाने देखील कुलदिप सिंह यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

याअगोदरही जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला होता

याअगोदरही पीडितेला जिवंत मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कार अपघात प्रकरणी निर्दोष सुटलेल्या ९ आरोपींपैकी एक मनोज सेनगल होता. २८ जुलै रोजी उन्नाव बलात्कार प्रकणातील पीडित तिचे दोन नातेवाईक आणि वकीलासोबत उत्तरप्रदेश मधील रायबरेली जिल्ह्यातून कारमधून प्रवास करत होती. त्यावेळी एका ट्रकच्या धडकेत त्यांच्या कारचा अपघात झाला होता. या अपघातात पीडित आणि तिच्या वकिलाला गंभीर दुखापती झाल्या. तर तिच्या दोन नातेवाईकांचा मृत्यू झाला होता. अपघातातून वाचल्यानंतर उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेने, आपल्या जीवाला धोका असून संरक्षण देण्याची मागणी करणारे पत्र सुप्रिम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना लिहिले होते. त्यानंतर सुप्रिम कोर्टाने या प्रकरणाशी संबंधित ५ केसेस उत्तरप्रदेशच्या बाहेर चालवण्यास तसेच पीडितेला सीआरपीएफचे संरक्षण देण्याचा आदेश दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -