मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरच्या चाहत्यांना तिच्या बॉलीवूड पदार्पणाची उत्सुकता लागली होती. तर तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता अक्षय कुमार ह्याच्यासोबत ‘पृथ्वीराज’ या ऐतिहासिक चित्रपटातून मानुषी अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. विशेष म्हणजे अक्षयकुमारचा देखील हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट आहे. अक्षयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या चित्रपटाची घोषणा केली आहे.
२०१७ मध्ये दोन टायटल नावावर
मानुषी छिल्लरनं २०१७ मध्ये मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड हे दोन्ही टायटल जिंकले. त्यानंतर तिचं आयुष्यचं बदललं. मिस वर्ल्ड झाल्यानंतर मानुषीला सिनेमांच्या ऑफर येऊ लागल्या. पण पदार्पणच्या सिनेमात अक्षय कुमारसोबत काम करायला मिळणं ही तिच्यासाठी खूप मोठी संधी आहे.
Here's to auspicious beginnings ? Stepping into the world of #Prithviraj. In theatres #Diwali2020!
Need your love and best wishes as always. @ManushiChhillar #DrChandraprakashDwivedi @yrf pic.twitter.com/w3KQh4NhPe— Akshay Kumar (@akshaykumar) November 15, 2019
लाइफ मला एखाद्या फेरी टेलसारखं वाटतं
याविषयी बोलताना मानुषी म्हणाली की, “माझ्यासाठी ही खूपच सन्मानाची गोष्ट आहे की यशराज फिल्मनं मला त्याच्या सिनेमाची हिरोइन म्हणून निवडलं. या प्रवासात मला अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. माझं लाइफ मला एखाद्या फेरी टेलसारखं वाटतं. आधी मिस इंडिया नंतर मिस वर्ल्ड आणि आता एवढ्या मोठ्या बॅनरखाली एका ऐतिहासिक सिनेमातील महत्त्वपूर्ण भूमिका साकारायला मिळत आहे.”
चित्रपटासाठी भव्य सेटची निर्मिती
‘पृथ्वीराज’ हा ऐतिहासिक चित्रपट आहे. ‘पृथ्वीराज महाकाव्या’ भोवती चित्रपटाची कथा फिरते. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी चक्क ३५ भव्य सेटची निर्मिती करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आणि राजस्थानमध्ये या ऐतिहासिक सेटची निर्मिती होणार आहे.
मानुषी साकारणार संयोगिता
‘पृथ्वीराज’ या चित्रपटात मानुषी छिल्लर प्रेयसी संयोगिताच्या भूमिकेत झळकणार आहे. खुद्द अक्षयकुमारने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. चित्रपटात अक्षयकुमार पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत दिसेल. ‘पृथ्वीराज’ चित्रपट २०२० मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.