घरCORONA UPDATEसावधान! कोरोनो घेतोय 'सिझनल आजाराचे' रुप

सावधान! कोरोनो घेतोय ‘सिझनल आजाराचे’ रुप

Subscribe

संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या कोरोनो व्हायरसला ऱोखण्यासाठी जगभरातील संशोधक अहोरात्र काम करत आहेत. काहींनी तर कोरोनावर लस शोधल्याचाही दावा केला आहे. मात्र याचदरम्यान जगाला पुन्हा एकदा हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरस अजून वर्षभर पृथ्वीवरच राहणार आहे. मात्र याकाळात तो सिझनल आजाराचे रुप घेईल असा खळबळजनक दावा अमेरिकेतील एका ज्येष्ठ संशोधकाने केला आहे.

अमेरिकेतील संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ ज्येष्ठ डॉक्टर अँथनी फाऊची यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवणे त्याचे समूळ उच्चाटन करणे हे आजच्या तारखेला अशक्य आहे. कोरोना हे वैद्यकिय क्षेत्रासमोरचे मोठे आव्हान असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर हळू हळू कोरोना क्रुतुबदलानंतर होणाऱ्या आजारांचे रुप धारण करेल. उदा , कुठलाही ऋुतु जेव्हा बदलतो तेव्हा शरीरावर त्याचे परिणाम होतात. त्यातही ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारकशक्ती कमी असते त्यांना ऋुतु बदलाच्या आजारांना सामोरे जावे लागते. तसेच कोरोनाबबतही होणार असल्याचे सांगितले आहे. सर्दी, पडसे, ताप ,खोकला ही कोरोनाचीही लक्षणे आहेत. यामुळे येत्या काळात प्रत्येकाला ऋुतु बदलात होणाऱ्या आजारांकडे गांभीर्याने बघावे लागेल असेही फाऊची यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -