घरदेश-विदेश'एम. जे. अकबर यांनी माझे कपडे फाडले', आणखी एक आरोप

‘एम. जे. अकबर यांनी माझे कपडे फाडले’, आणखी एक आरोप

Subscribe

एम. जे. अकबर यांच्यावर अमेरिकेतील महिला पत्रकार पल्लवी गोगोई यांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. २३ वर्षांपूर्वी अकबर यांनी माझ्यावर बलात्कार केला होता असा आरोप त्यांनी वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या लेखात केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून #MeToo प्रकरणामध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री एम. जे. अकबर यांचं नाव वारंवार समोर येत आहे. भारतातील अनेक महिला पत्रकारांसोबतच इतर महिलांनीही एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले असतानाचा आता त्यात आणखीन एका नावाचा समावेश झाला आहे. धक्कादायक म्हणजे यावेळी अमेरिकन महिला पत्रकाराने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे एम. जे. अकबर अजूनच गोत्यात येण्याची शक्यता आहे. अमेरिकेत राहणाऱ्या महिला पत्रकार पल्लवी गोगोई यांनी हा आरोप केल्यानंतर भारतीय माध्यम क्षेत्रासह राजकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

भारतात अनेक महिला पुढे येऊन सोशल मीडियावर किंवा प्रसार माध्यमांसमोर आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडत असताना पल्लवी गोगोई यांनी थेट अमेरिकेतल्या ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या प्रथितयश दैनिकामध्ये एम. जे. अकबर यांच्यावर हा धक्कादायक आरोप केला आहे. १९९४मध्ये म्हणजेच तब्बल २३ वर्षांपूर्वी अकबर यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं त्यांनी या लेखात नमूद केलं आहे.

काय घडलं होतं जयपूरमध्ये?

या लेखात गोगोई यांनी घडलेला सर्व प्रकार कथन केला आहे. त्यांना नमूद केल्याप्रमाणे, जयपूरमध्ये गोगोई आणि एम. जे. अकबर एका बातमीवर चर्चा करत होते. त्यावेळी अकबर यांनी त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला गोगई यांनी विरोध केला. मात्र, अकबर यांनी त्यांचे कपडे फाडले आणि त्यांच्यावर बलात्कार केला. या घटनेआधीही दोनदा अकबर यांनी गोगोई यांचं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी त्या स्वत:ला वाचवण्यात यशस्वी ठरल्या होत्या.

- Advertisement -

एम. जे. अकबर पुरते अडकले?

काही दिवसांपूर्वीच अकबर यांनी #MeToo मोहिमेमध्ये त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. तसेच, त्यांच्यावर आरोप करणाऱ्या प्रिया रामानी या भारतीय महिला पत्रकाराचे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचा दावा त्यांनी आपल्या जबाबात केला होता. त्यामुळे आता या नव्या आरोपांमुळे ते पुन्हा एकदा अडचणीत येणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -