सरदार असरदार! मुस्लिम तरुणाला मरता मरता वाचवलं

गगनदीप सिंह मुस्लिम तरूणाला वाचवताना

उत्तराखंडमधल्या रामननगरमधील असलेल्या गिरीजा मंदिरात प्रेमी युगुल भेटले. मुलगी हिंदू तर मुलगा मुस्लिम. पण, स्व:ताला धर्माचे रक्षक अशी बिरूदावली मिरवणाऱ्या लोकांना मात्र ही बाब खटकली. त्यांनी थेट जाब विचारत मुस्लिम मुलाला मारहाण केली. शिवाय मुलीला देखील अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत तुमचे तुकडे करु, अशी धमकी दिली. धर्मरक्षकांचा घोळका आक्रमक झाला. त्यानंतर मुलाला जबर मारहाण करण्यात आली. पण, गगनदीप सिंह या कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याने वेळीच हस्तक्षेप करत मुस्लिम तरूणाला वाचवले. या साऱ्या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत तरूणाला वाचवले. तरूणाला पोलिसांनी बाहेर घेऊन जाऊ नये याकरता घोळक्याने मंदिराचा गेट देखील बंद केला. पण, दबावाला पोलिस जुमानत नाहीत हे लक्षात येताच पोलिसांना अडवण्याचा प्रकार सुरू झाला. शिवाय पोलीस प्रशासन हाय हाय असे नारे दिले. कोणत्याही दबावाला बळी न पडता पोलिसांनी या तरूणाला वाचवले आणि सुखरूप पोलिस स्टेशनला नेले. परिणामी ‘लिंचिंग’ सारखा गंभीर गुन्हा देखील टाळता आला. पोलिसांनी संबंधित तरूण-तरूणीच्या घरी कळवून दोघांनाही त्यांच्या पालकांच्या हवाली केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here