घरदेश-विदेशसंकटमोचन मंदिर उडवून लावण्याची धमकी

संकटमोचन मंदिर उडवून लावण्याची धमकी

Subscribe

२००६ च्या बॉम्बस्फोटापेक्षा मोठा स्फोट वाराणसीच्या संकटमोचन मंदिरात करु, अशी धमकी देणारं एक पत्र मंदिराच्या पुजाऱ्यांना आलं आहे.

उत्तरप्रदेशच्या वाराणसीतील संकटमोचन हनुमान मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. हे मंदिर बॉम्बस्फोटाने उडवून लावण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीबाबतचं एक पत्र मंदिराच्या मुख्य पुजाराऱ्यांना मिळालं आहे. २००६ साली करण्यात आलेल्या बॉम्बस्फोटापेक्षा मोठी स्फोट आम्ही मंदिरामध्ये घडवून आणू, अशी धमकी या पत्रामधून देण्यात आली आहे. याविषयी माध्यमांना माहिती देतेवेळी मंदिराचे पुजाऱ्यांना सांगितलं की, संकटमोचन मंदिराला बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी असेललं पत्र सोमवारी रात्री आम्हाला मिळालं. या पत्रामध्ये असं लिहीलं आहे की, आमच्या या धमकीकडे दुर्लक्ष करु नका, आम्ही २००६ पेक्षाही मोठी बॉम्बब्लास्ट करु. दरम्यान, या पत्राबाबत पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे. तसंच हे पत्रदेखील पोलीसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी असलेल्या या पत्रात अशोक यादव आणि जमादार मियाँ या दोघांची नावं आहेत.


वाचा: ६ डिसेंबरपूर्वी दादरचे नामांतर करा – भीम आर्मी

पोलिसांनी या पत्राची गंभीरतेने दखल घेत, अशोक यादव आणि जमादार मियाँ या दोघांविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे. तसंच मिळालेल्या माहितीनुसार पोलिंसानी याप्रकरणी तात्काळ पुढील तपास सुरू केला आहे. यापूर्वी ७ मार्च २००६ रोजी संकटमोचन मंदिर परिसरात बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता. त्याचवेळी कँट स्टेशन आणि दशाश्वमेध घाट या ठिकाणीही बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले होते. २००६ सालच्या या साखळी सोफ्टांमध्ये संकटमोचन मंदिरात ७ तर कँट स्टेशनमध्ये ११ लोक दगावले होते आणि जवळपास १०० हून अधिक लोक जखमी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -