Saturday, August 8, 2020
Mumbai
28.6 C
घर ताज्या घडामोडी VIDEO : बंदरात क्रेन कोसळून मोठी दुर्घटना; १० जण ठार

VIDEO : बंदरात क्रेन कोसळून मोठी दुर्घटना; १० जण ठार

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड इथे क्रेन कोसळून दहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Andhra Pradesh
visakhapatnam hindustan shipyard limited crane accident 10 people dead in andhra pradesh
VIDEO : बंदरात क्रेन कोसळून मोठी दुर्घटना; १० जण ठार

विशाखापट्टणम इथे गॅस गळतीनंतर पुन्हा एक मोठी दुर्घटना घडली आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड इथे क्रेन कोसळून दहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक मजुर गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

नेमके काय घडले?

विशाखापट्टणममधील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड इथे लोडिंगच्या कामाची पाहणी करताना क्रेन कोसळल्याने १० कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत एक मजूर जखमी झाल्याचे डीसीपी सुरेश बाबू यांनी सांगितले आहे. जखमी झालेल्या मजुराला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, या घनेमुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.


हेही वाचा – दुचाकीवरून प्रवास करताय! लोकल ब्रँडचे हॅल्मेट वापरल्यास आता होणार दंड; जाणून घ्या, नवा नियम


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here