घरताज्या घडामोडीएनसीआरवरून बंगालमध्ये हिंसाचार, घरांची जाळपोळ

एनसीआरवरून बंगालमध्ये हिंसाचार, घरांची जाळपोळ

Subscribe

पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यत एनआरसीवरून हिंसाचार सुरू झाल्याचे वृत्त आहे. एनसीआरसाठी बोगस कागदपत्रे तयार करत असल्याच्या संशयावरून जमावाने एका २० वर्षीय महिलेला मारझोड केली व नंतर तिचे घरे पेटवून दिले. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

येथील बीरभूम जिल्ह्यात गौरबाजार नावाचे गाव आहे. येथे काही लोकांनी चुमकी खातून नावाच्या महिलेवर एनसीआरसाठी बोगस कागदपत्रे जमा केल्याचा आरोप केला. त्यानंतर जमावाने महिलेला घरातून बाहेर खेचत आणले व तिला लाथाबुक्क्यांनी तुडवले. त्यानंतर समाजकंटकांनी महिलेचे व तिच्या घराशेजारील अनेक घरं पेटवली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून महिलेला व तिच्या कुटुंबीयांना पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -