दरवाजा उघडताच कार मागे गेली; झाड आणि कारच्या मध्ये महिला चिरडली

अपघातात महिलेच्या डोक्याला जबरदस्त मार लागला.मोठ्या प्रमाणात ब्लड लॉस झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला .

women dies between tree And car door in bangalore
दरवाजा उघडताच कार मागे गेली; झाड आणि कारच्या मध्ये महिला चिरडली

कार दुर्घटनेच्या अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आपण पाहत असतो. अपघाताची प्रत्येक घटना अंगावर काटा आणणारी असते. अशीत एक घटना बंगळूर मध्ये घडली आहे. गाडीचा दरवाजा उघडताच गाडी अचानक मागे गेली. गाडीचा दरवाजा आणि मागे असलेल्या झाडामध्ये चिरडून महिलेचा मृत्यू झाला. मृत महिलेचे वय ४५वर्षे होते.  या विचित्र अपघाताचा सगळा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. सोशल मीडियावरही हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

बंगळूर येथील सदाशिवनगर वाहतूक पोलिस स्टेशन जवळील बीईएल रोडवरील आर के गार्डन येथे बुधवारी संध्याकाळी हि घटना घडली. बीईएल रोडवर या महिलेने तिची हॉन्डा सीटी गाडी पार्क केली होती. गाडी पार्क केली त्या ठिकाणी मागे झाड होते. महिला गाडीचा दरवाजा उघडून आत बसत होती. तेवढ्यात गाडी अचानक मागे गेली. गाडीचा दरवाजा आणि मागे असलेले झाड यात ती महिला चिरडून तिचा जागीच मृत्यू झाला. हा सगळा प्रकार मृत महिलेच्या शेजाऱ्यांनी बसवलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेने गाडीचा दरवाजा उघडताच अजाणतेपणी गाडी सुरू केली. त्यामुळे गाडी मागे गेली आणि हा अपघात झाला. अपघातात महिलेच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. यातून मोठ्या प्रमाणात ब्लड लॉस झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच घटनास्थळी असलेल्या लोकांनी त्या महिलेला ताबतोब रूग्णालयात दाखल केले. मात्र रूग्णालयात नेताच डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले.


हेहि वाचा – UP: ४५ यात्रेकरूंना घेऊन निघालेली खासगी बस उलटली