घरताज्या घडामोडीपर्यावरण दिनाचे औचित्य साधून मोदी सरकारने सुरु केला 'शहरी वन्य कार्यक्रम'

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मोदी सरकारने सुरु केला ‘शहरी वन्य कार्यक्रम’

Subscribe

शहरी पर्यावरणात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने शहरांमध्ये जंगल क्षेत्र वाढविण्यासाठी नवी योजना घेऊन येत आहे. शुक्रवारी ५ जून आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाचे औचित्य साधून केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या योजनेची घोषणा केली. ही योजना देशातील २०० शहरांमध्ये सुरु करण्यात येणार आहे.

कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी व्हर्च्युअल इव्हेंटच्या माध्यमातून या योजनेची सुरुवात करण्यात आली. जावडेकर म्हणाले की, “आपल्या ग्रामीण भागात जंगल आहेत, मात्र शहरी भागात जंगल नाही. त्यामुळे शहरात आता जंगल वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.”

- Advertisement -

शहरी भागात वनीकरण करण्यासाठी सरकार आर्थिक मदत देणार असल्याचे देखील जावडेकर यांनी सांगितले. तसेच या योजनेत देशातील जनतेनेही सहभागी व्हावे, असे आवाहन जावडेकर यांनी केले. ते म्हणाले की, मी सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी एकत्र येऊन शहरात जंगल क्षेत्र वाढवूया. या कामासाठी पीपीपी मॉडेलचा अवलंब केला जाणार आहे. तसेच ज्या शहरांमध्ये योजनेची अंमलबजावणी चांगली होईल, त्यांना पुरस्कारही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जैव विविधता Biodiversity ही संकल्पना ठेवण्यात आली आहे. यावर भाष्य करताना जावडेकर म्हणाले की, भारतात एकूण जगापैकी ८ टक्के एवढी जैव विविधता कायम आहे. तसेच जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी १६ टक्के लोकसंख्या एकट्या भारतात आहे. तेवढीच पशू-प्राण्यांचीही संख्या आहे. तर जगाच्या तुलनेत २.५ टक्के जमीन आणि ४ टक्के एवढा जलसाठा असूनही भारताने जैव विविधतेचा स्तर कायम ठेवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -