घरदेश-विदेशबहुमत नसूनही कर्नाटकात येडीयुरप्पांचं सरकार!

बहुमत नसूनही कर्नाटकात येडीयुरप्पांचं सरकार!

Subscribe

गुरूवारी सकाळी येडियुरप्पांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना गोपनीयतेची शपथ दिली. विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यानंतरच त्यांच्या इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना 15 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

 

- Advertisement -
बी. एस. येडियुरप्पा, नवनिर्वाचित मुख्यमंत्री कर्नाटक

तिसऱ्यांदा घेतली येडीयुरप्पांनी शपथ

मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची येडियुरप्पांची ही तिसरी वेळ आहे. शपथविधी दरम्यान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, धर्मेंद्र प्रधान, जे.पी. नड्डा आणि भाजपाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आनंद साजरा केला.

- Advertisement -

राज्यपालांच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात

राज्यपालांनी येडियुरप्पांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिल्यानंतर काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण सर्वोच्च न्यायालयानं त्यांचा शपथविधी रोखण्यास नकार दिला. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) नेत्यांकडून विधिमंडळाच्या आवारातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयात रंगला मध्यरात्री ड्रामा

सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) यांनी राज्यपालांकडे दावा केला होता. राज्यपालांनी हा दावा फेटाळून लावत भाजपला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले. याविरोधात काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मध्यरात्री १.४५ वाजता या प्रकरणाची सुनावणी पार पडली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) यांचा दावा फेटाळून लावला. सर्वोच्च न्यायालयात मध्यरात्री सुनावणी होण्याची ही दुसरी वेळ आहे. यासंदर्भातील पुढील सुनावणी गुरूवारी म्हणजेच आज सकाळी १०.३० वाजता होणार आहे.

 

रणदीप सुरजेवाला, प्रवक्ते, काँग्रेस

‘ही तर लोकशाहीची हत्या’

दरम्यान, ही लोकशाहीची हत्या असल्याचे मत काँग्रेसचे नेते रणजीत सुरजेवाला यांनी व्यक्त केलं आहे. शिवाय उद्धव ठाकरे यांनी देखील ही केंद्र सरकारची हातचलाखी असल्याचे म्हटले आहे. आजच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते? याकडे राजकीय पंडितांसह साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -