ठाण्यातील विनोदकुमार करताहेत ‘प्लास्टिक मुक्त भारत’ची जनजागृती!

Thane
vinodkumar jaju
विनोदकुमार रामेश्वरलाल जाजू

आमच्या गणपती बाप्पाचे हे २१ वे वर्ष आहे. त्या अनूशंगाने पर्यावरणाचा विचार करून पर्यावरण संरक्षण होण्याकरता घातक ठरणाऱ्या प्रमुख वस्तू (म्हणजे प्लास्टिक) हा विषय घेऊन “प्लास्टिक मुक्त भारत” ही संकल्पना राबवत यंदाचा देखावा साकारण्यात आला आहे, अशी माहिती ठाण्याचे विनोदकुमार जाजू त्यांच्या गणपतीबाबत सांगतात. या देखाव्यांच्या माध्यमातून पर्यावरणाला प्लास्टिक कशा प्रकारे घातक आहे, याचे ज्वंलत उदाहरण म्हणजे हिमालय पर्वतावर प्लास्टिकचा साचलेला कचरा. मागच्या दोन वर्षांपूर्वी अनेक टन कचरा पर्यावरण स्नेही संघटना ट्रेकर्स यांनी संयुक्तपणे स्वच्छता अभियान मोहिम राबवण्यात आली होती. त्यांचे प्रतिक म्हणून हिमालय पर्वत व पर्वतांच्या आजूबाजूला सर्वसाधारण जीवनात अपायकारक होणाऱ्या घटनांचे चित्र रुपात साकारण्यात आले आहे. त्यामध्ये गाय, कासव असे अनेक वेगवेगळे प्राणी, पक्षी प्लास्टिक खातात हे दॄश्य तसेच जमिनीमध्ये गाडले गेलेले प्लास्टिकच्या वस्तू हेदेखील दाखवण्यात आले आहे.


हे वाचा –  इको फ्रेंडली स्पर्धेबद्दल माहितीमुंबई ही प्लास्टिक पिशव्यांमुळे ‘तुंबा’पुरी झाली आहे. त्याचप्रकारे कोल्हापूर, सांगली यासारखे जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची माहिती देखील देखाव्यात आवर्जून दाखवण्यात आली आहे. तसेच बंगळुरू येथे प्लास्टिकने ४५० किलो मीटरचा रस्ता बनवण्यात आला आहे. परिवार बाजारात जाताना त्यांच्या हातात देखील प्लास्टिकच्या पिशव्या दाखवण्यात आले आहेत. त्याला पर्याय म्हणून कागदी पिशवी आणि कापडी पिशवी दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे पर्यायवरणाचा विचार करून आमच्या गणपती बाप्पाची मुर्तीदेखील शाडू मातीची बनवलेली आहे. गणपती बाप्पाच्या हातामध्ये छोटीशी कागदाची पिशवी दाखवली आहे. गणपती बाप्पा विराजमान झालेल्या ठिकाणी एक फिरते चक्र आहे. त्यावर वेगवेगळे घोषवाक्य आहे.

या साहित्यांनी केली सजावट

सायकलची रिंग, कॉटन कपडा, कापूस, पेपर, सुई -दोरा, इलेक्ट्रीक मोटर, रंग (वॉटर कलर), डिंक, डोंगरसाठी स्टीलचे १६ रॉड, इलेक्ट्रीक हेलोजन, प्लायवूड


स्पर्धकाचे नाव : विनोदकुमार रामेश्वरलाल जाजू
पत्ता : ए /१०४, मनोबल हाऊसिंग सोसायटी, वेदांत मोटार ट्रेनिंग स्कूलसमोर, आई माताजी मंदिरच्या बाजूला, महात्मा फुले नगर, सावरकर नगर, ठाणे (प.) – ४०० ६०६