घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाप्लास्टिक बंदीचा संदेश देणारा रेखा मालपुरेंचा बाप्पा

प्लास्टिक बंदीचा संदेश देणारा रेखा मालपुरेंचा बाप्पा

Subscribe

पेपरमधील कात्रणांसहीत पर्यावरणांचा संदेश देणारा मालपुरे कुटुंबियांचा बाप्पा - वोट करा

कल्याणच्या रेखा मालपुरे यांच्या बाप्पाचे हे २८ वे वर्ष असून त्यांच्या घरी पाच दिवसांचा गौरी गणपतीचा सण साजरा केला जातो. यंदा २८ व्या वर्षी त्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने शाडूची मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. तसेच देखाव्या मधून देखील पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे.

जाणून घ्या – इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्ट बद्दल

 

- Advertisement -

रेखा यांच्या बाप्पाची संकल्पना पर्यावरण संवर्धनाची असून त्यातून प्लास्टिक बंदी, पाणी वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा अशाप्रकारचे संदेश दिले गेले आहेत. हे संदेश एका देखाव्यातून त्यांनी दिसा असून पर्यावरणासंबंधित वृत्तपत्रांमधील कात्रणे लावून त्यांनी देखावा तयार केला आहे. रेखांजीच्या गणपतीचे विसर्जन घरीच त्यांच्या बागेत केले जाते. विसर्जन केल्यानंतर त्याचे पाणीही बागेतील झाडांना दिले जाते. विशेष म्हणजे मूर्तीच्या विसर्जना नंतरची मातीही पुन्हा मूर्तीकारास दिली जाते.

रेखा मालपुरे यांच्या संकल्पनेला दाद देण्यासाठी वोट करा.

- Advertisement -

तुमचा बाप्पांसोबतचा सेल्फी अपलोड करा

 

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -