अक्षय कुमार लाल किल्ल्यावर

Mumbai
Akshay Kumar

दिल्लीचं वैभव म्हणून लाल किल्ल्याकडे पाहिले जाते. भारताचा समृद्ध इतिहास ज्या किल्ल्यात दडलेला आहे तो लाल किल्ला. भारतीयांचे, परदेशी पर्यटकांचे श्रद्धास्थान म्हणून लाल किल्ला आवर्जून पाहणे असते. भारताच्या सर्वश्रेष्ठ नेत्याला भारतीय नागरिकांशी संवाद साधायचा असेल तर हाच लाल किल्ला महत्त्वाचा वाटलेला आहे. पंतप्रधान भारतीयांशी संवाद साधतात ते याच किल्ल्यावरून. इथे जवळपास चित्रपटाचे चित्रीकरण होत असले तरी प्रमोशनसाठी या जागेशिवाय दुसरी जागा नाही याचा शोध ‘केसरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग सिंग आणि पाच निर्माते यांनी लावला आणि चक्क चित्रपटाचा नायक अक्षय कुमार याला भल्या पहाटे याच किल्ल्यावर धावून चित्रपटाचे प्रमोशन करायला लावले.

अक्षय कुमार यांनी आजवर जेवढे म्हणून चित्रपट केले त्यापैकी ‘केसरी’ या चित्रपटाविषयी त्याला स्वत:ला अधिक आत्मियता आहे. देशभक्ती हा या चित्रपटाचा मुख्य विषय आहे. अक्षय कुमारच्या सामाजिक भान असलेल्या मनाने प्रबोधनात्मक चित्रपट केले आहेतच; परंतु सामाजिक कार्य करण्यातही अक्षय हा पुढे राहिलेला आहे. भारताचे संरक्षण करताना मृत्यूला सामोरे गेलेल्या शहीद जवानांसाठी घरपोच अर्थसहाय्य ही कल्पना उचलून धरली आणि त्याचा तांत्रिकदृष्ठ्या वापर करून त्याचा सार्थ अभिमान वाटावा असे कार्य त्याने केलेले आहे. ‘केसरी’च्या प्रमोशनात याविषयीही तो जनजागृती करत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here