आलिया भट्ट ड्राईव्हरच्या मदतीसाठी आली धावून…

Mumbai
Alia Bhatt gifts Rs 50 lakh to her friver
फाईल फोटो

हिंदी चित्रपटसृष्टीतील सध्याची आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट हिने नुकताच तिचा २६ वा वाढदिवस साजरा केला. यादिवशी आलियावर तिच्या परिवाराकडून तसंच चाहत्यांकडून कौतुकाचा आणि गिफ्ट्सचा वर्षाव झाला असणार यात काहीच शंका नाही. एका खासगी वेबसाईटच्या माहितीनुसार, आलियाच्या वाढदिवसानिमित्त तिचा कथित बॉयफ्रेंड रणबीर कपूर याने एक रोमँटिक डेटही प्लॅन केली होती. मात्र, आलियाचा बर्थडे खऱ्या अर्थाने चर्चेत आला तो तिने दिलेल्या खास रिटर्न गिफ्ट्समुळे. आलियाने तिच्या ड्राईव्हर आणि हेल्पर बॉयला यादिवशी विशेष गिफ्ट्स दिली. एका इंग्रजी वेबसाईटच्या वृत्तानुसार, आलियाने बर्थडेचं रिटर्न गिफ्ट म्हणून तिच्या ड्राईव्हर आणि हेल्परला ५०-५० लाख रुपये दिले. मात्र, एवढी मोठी रक्कम देण्यामागे कारणही तसंच विशेष होतं.

आलियाने स्वत:चा ड्राईव्हर आणि हेल्पर या दोघांना घर घेण्यासाठी मदत म्हणून ५० -५० लाखांचा धनादेश दिला. ड्राईव्हर सुनील आणि हेल्पर अनमोल हे आलियासोबत ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ या तिच्या पहिल्या चित्रपटापासून एकत्र आहेत. आजही त्यांनी आलियाची साथ सोडलेली नाही. या दोघांनाही घर घेण्यासाठी पैशाची गरज असल्याचं आलियाला समजलं होतं. त्यामुळे वाढदिवसाचं निमित्त साधत तिने या दोघांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत केली. आलियाने एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, ती नेहमीच तिच्या संपूर्ण टीमची काळजी घेत असते.

आलियाचा ‘कलंक’

सध्या आलियाच्या चाहत्यांना उत्सुकता आहे ती तिच्या आगामी ‘कलंक’ चित्रपटाची. नुकतंच या चित्रपटातील ‘घर मोहे परदेसीया’ हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आलियाने या गाण्यातील तिच्या कथ्थक नृत्याने सगळ्यांनाच घायाळ केलं आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षित, संजय दत, आलिया भट आणि वरूण धवन यांच्याबरोबर आदित्य रॉय कपूर, कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here