घरमनोरंजनबिग बी यांचं ट्विटर अकाऊंट हॅक

बिग बी यांचं ट्विटर अकाऊंट हॅक

Subscribe

हॅकर्सने फक्त फोटोमध्येच बदल केलेला नसून बच्चन यांच्या वैयक्तिक माहितीत देखील बदल करून त्यात लव पाकिस्तान असे लिहिलेले दिसत आहे

बॉलिवूड विश्वातील महानायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाऊंट सोमवारी रात्री हॅक करण्यात आले. हॅकर्सने अभिनेता अमिताभ यांचा प्रोफाईल फोटो बदलून त्या जागी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो लावण्यात आला आहे. हॅकर्सने फक्त फोटोमध्येच बदल केलेला नसून बच्चन यांच्या वैयक्तिक माहितीत देखील बदल करून त्यात लव पाकिस्तान असे लिहिलेले दिसत आहे. तसेच, या अकाऊंटवरुन पाकिस्तानशी संबंधित मसेजही शेअर करण्यात आला आहे.

- Advertisement -

तुर्कीच्या एका हॅकर ग्रृप तुर्कीश सायबर आर्मी ‘अयिल्दिज तिम’ कडून अमिताभ बच्चन यांचे अकाऊंट हॅक केल्याचे सांगितले जात आहे. अकाऊंट हॅक केल्यानंतर हॅकर्सने टर्की आणि पाकिस्तान संबंधित काही मेसेजेसही पोस्ट केले आहेत.

- Advertisement -

याच अकाऊंटवरून फोटो, माहिती शेअर केल्यानंतर असे पोस्ट केले, ‘हा संपूर्ण जगासाठी एक महत्वपूर्ण संदेश आहे. तुर्कस्तानच्या फुटबॉलपटूंना आइसलँड रिपब्लिकने दिलेल्या वागणूकीचा आम्ही निषेध करतो.’ यानंतर हॅकर्सने पुढे पोस्ट केलं की, ‘एक मोठा सायबर हल्ला होणार आहे’. यानंतर त्यांनी आपला लोगो सुद्धा शेअर केल्याचे दिसतेय.

टर्कीश सायबर आर्मीकडून हे अकाऊंट हॅक केल्याची प्राथमिक माहिती आहे. अमिताभ यांच्या ट्विटर अकाऊंटला ३७.४ मिलियन्स फॉलोवर्स आहेत. अशा परिस्थितीत चाहत्यांनी अमिताभ यांच्या ट्विटर अकाऊंटवरील पोस्टला लाईक किंवा कमेंट करणे योग्य नाही. त्यामुळे कोणीही कोणत्याही पोस्टला रिट्विट करू नये.

अकाऊंट हॅक केल्यानंतर काही वेळाने या ट्विटर अकाऊंट वरून इमरान खान यांचा फोटो आणि कव्हर फोटो दोन्ही काढण्यात आले. मात्र अकाऊंट हॅक केले त्या दरम्यान सोशल मीडियावर चर्चेना उधाण आले होते. हे हॅक झालेल्या अकाऊंटचे फोटो व्हायरल झाल्यानंतर लोक अनेक प्रकारे मीम्स तयार करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -