पुन्हा एकदा उदय – मजनू येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'वेलकम ३' आणि 'वेलकम ४' हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. वेलकम ३ या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान करणार आहेत.

Mumbai
welcome 3.
नाना पाटेकर,जॉन अब्राहम, अनिल कपूर

नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवायला सज्ज झाली आहे. वेलकम आणि वेलकम २ या चित्रपटानंतर आता ‘वेलकम ३’ आणि ‘वेलकम ४’ हे चित्रपटसुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तसेच हे सिनेमे एकापाठोपाठ प्रदर्शित होणार आहेत. वेलकम ३ या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान करणार असून नाना पाटेकर, अनिल कपूर आणि जॉन अब्राहम या तिघांच्या नावावर शिक्का मोर्तब झाला आहे. वेलकम ३ हा चित्रपट २०२० तर वेलकम ४ हा २०२१ मध्ये प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न असणार आहे. वेलकम ३ चित्रपटांच्या चित्रीकरणाला काही महिन्यातच सुरुवात होणार असल्याची माहिती पीटीआयने संस्थेने दिली आहे.

प्रमुख भूमिकेतील कलाकारांनी उत्सुकता

वेलकम हा चित्रपट २००७ साली तर वेलकम २ हा २०१५ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार, परेश रावल, नाना पाटेकर, अनिल कपूर, कतरिना कॅफ, परेश रावल ही स्टारकास्ट होती. या सिनेमाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं. वेलकम २ मध्ये अक्षय कुमार आणि कतरिना कैफ ऐवजी जॉन अब्राहम आणि श्रुती हसन हे मुख्य भूमिकेत होते. त्यामुळे आता वेलकम ३ आणि वेलकम ४ मध्ये नक्की कोण असणार या उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

हाऊसफुल ४ चा वाद

तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर नाना पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहेत. परंतू या आरोपांनमुळे नाना पाटेकर यांना ‘हाउसफूल ४’ या चित्रपटातून काढून टाकण्यात आले. पण आता वेलकम ३ मधून नाना पुन्हा बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. हाऊसफुल ४ या सिनेमात अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि सनी देओल ही तगडी स्टारकास्ट असून या चित्रपटाचे दिग्दर्शन साजिद खान ऐवजी फरहाद सामजी करणार आहेत.