घरमनोरंजन#MeToo : साजिद खानला झटका; IFTDA ने केले निलंबित

#MeToo : साजिद खानला झटका; IFTDA ने केले निलंबित

Subscribe

इंडियन फिल्म अँड टेलीव्हिजन डायरेक्टर (IFTDA) ने साजिद खानवर निलंबनाची कारवाई केली आहे.

देशात सुरु झालेल्या मीटू मोहिमेचा परिणाम आता दिसू लागला आहे. या प्रकरणी दिग्दर्शक साजिद खान याच्यावर अनेक महिलांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले. आरोप झाल्यावर त्वरीत त्याला हाऊसफुल्ल ४ चित्रपटातून बाहेर काढण्यात आले. आता साजिदला आणखी एक झटका देण्यात आला आहे. इंडियन फिल्म अँड टेलीव्हिजन डायरेक्टर (IFTDA) ने साजिद खानवर निलंबनाची कारवाई केली आहे. मंगळवारी रात्री उशीरा साजिद ही संबंधीची नोटीस बजावण्यात आली.

- Advertisement -

वाचा – ‘साजिदने मला कपडे काढायला लावले’

वाचा – #Metoo : ‘१० वर्षानी आवाज उठवणं चुकीचं’

- Advertisement -

वाचा – #Metoo चळवळीचा खरा अर्थ

एक वर्षासाठी केले निलंबित 

इंडियन फिल्म अँड टेलीव्हिजन डायरेक्टरचे प्रवक्ता यांनी सांगितले की, #MeToo संबंधीत तपास करणाऱ्या IFTDA च्या ICC समितीने सध्या साजिद खान एका वर्षासाठी निलंबित केले आहे. साजिद खान याच्यावर अभिनेत्री सिमरन सूरी, सलोनी चोप्रा आणि अहाना कुमरासह अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. तर साजिदने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -