छोटा पडदा ते चित्रपट असा प्रवास करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने तिच्या पहिल्या वहिल्या चित्रपटातील फस्ट लुक सोशल मीडियावर शेअर केलं आहे. अभिनेत्री कंगना रणौत हिच्या ‘मणिकर्णिका’ या आगामी चित्रपटातून अंतिका लोखंडे बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात ती ‘झलकारीबाई’ ही व्यक्तीरेखा साकारत आहे. ‘मणिकर्णिका’ हा झांसी की राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट असून कंगना राणी लक्ष्मीबाईची व्यक्तीरेखा साकारत आहे. झलकारीबाई ही राणी लढाऊ सैनिकांमधील एक महिला योद्धा होती. तर वेळप्रसंगी त्यांची सल्लागारही होती. आज, गुरुवारी त्यांची १८८ वी जयंती असून या निमित्ताने अंकिता लोखंडे हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
- Advertisement -
वाचा : कंगनाच्या मणिकर्णिका चित्रपटाचा टीझर लाँच
- Advertisement -
वाचा : कंगनाच्या ‘मणिकर्णिका’ला आणखीन एक झटका!