‘सुशांतची हत्या झाली असं मी कधीच म्हटलं नाही’, अंकिताने पोस्ट करत केला खुलासा

सुशांतच्या आत्महत्येनंतर सातत्याने चर्चेत असणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे, एकापोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  सुशांतची हत्या झाली असं मी कधीच म्हणाले नाही, असं अंकिताने म्हटलं आहे. याविषयी तिने एक मोठी पोस्टदेखील शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीविषयीदेखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

अंकिता पोस्टमध्ये म्हणते, मी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगते, मला सतत प्रसारमाध्यमातून एकच प्रश्न विचारले जात आहेत. सुशांतची हत्या आहे की आत्महत्या? पण सुशांतची हत्या झाली असं मी कधीच म्हटलं नाहीये आणि  कोणाला दोषीदेखील म्हटलं नाहीये. मी कायम सुशांतला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सत्य हे तपासयंत्रणांच्या माध्यमातून समोर यावं. एक महाराष्ट्रीयन व्यक्ती आणि भारताची नागरिक असल्यामुळे मला महाराष्ट्र राज्य सरकार, पोलीस यंत्रणा आणि केंद्र सरकार यांच्यावर पूर्ण विश्वास आहे”, असं अंकिता म्हणाली.

 

View this post on Instagram

 

BRAVEHEART ❤️ Exorbitant love & More Power to you 💪🏻 @kanganaranaut

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

 पुढे पोस्टमध्ये अंकिता म्हणते, अनेकांनी मला जाहीरपणे विधवा किंवा सवत असं म्हटलं नाही, मात्र मी त्याचीही कधी उत्तरं दिली नाहीत. मी फक्त २०१६ पर्यंत त्याच्यासोबत काय काय झालं हे सांगण्याचा प्रयत्न केला.

अंकिताने या पोस्टमध्ये रिया चक्रवर्तीदेखील काही प्रश्न विचारले आहेत. जर तुझं सुशांतवर इतकं प्रेम होतं तर त्याला ड्रग्ज घेताना अडवलं का नाही? असे प्रश्न अंकिताने विचारले आहेत. सुशांतच्या आत्माहत्येच्या एक महिन्यानंतर अंकिता लोखंडे सातत्याने सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहे. रियाला एनसीबीने अटक केल्यानंतर देखील अंकिताने सोशल मीडियावर पोस्ट केली होती.


हे ही वाचा – दीपिका निघाली गोव्याला, चाहत्यांना मिळणार खास सरप्राईझ!