बॉलिवूडच्या कलाकारांचा मोदी सरकारच्या निर्णयावर कौतुकांचा वर्षाव

मोदी सरकारच्या कलम ३७० जम्मू-काश्मीरमधून हद्दपार केल्याचा प्रस्ताव आज राज्यसभेत मांडला. यादरम्यान घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत सोशल मीडियावरून भाजप सरकारवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Mumbai
Article 370 scrapped in Jammu and Kashmir bollywood celebrity react article

नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली मंगळवारी जम्मू-काश्मीरबाबत एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या ऐतिहासिक निर्णयावर सोशल मीडियावरून कौतुकांचा वर्षाव होत आहे. यापुढे जम्मू-काश्मीरला आपल्या विशेष दर्जाचा उपभोग घेता येणार नाही. तसेच भारतीय राज्यघटनेतील आता सर्व तरतूदी जम्मू-काश्मीरला लागू होणार आहे. भारत सरकारने जम्मू-काश्मीरला विधानसभा केंद्रशासित प्रदेश आणि लडाखला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केलं आहे.

या निर्णयावर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारच्या भारतीयांना एक राष्ट्र बनवण्याच्या निर्णयाबद्दल अनेकांनी कौतुक केलं आहे. तर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री उमर अब्दुला आणि मेहबुबा मुफ्ती यांनी या निर्णयावर टीका केली आहे.

टि्वटरवर रवीना टंडन आणि विक्रांत मॅसे या बॉलिवूड कलाकारांनी सरकारच्या निर्णयाबद्दल अभिनंदन केलं आहे. रवीना टंडन हीने टि्वटर अकाउंटवर भारताच्या ध्वजाचे इमोजीस ट्विट केलं आहे.

तसेच द डेथ इन द गुंज विक्रांत मस्से यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहे.

अभिनेत्री कंगना रनौत हिने इन्स्टाग्रामवर या निर्णयाबाबत पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने असं लिहिलं आहे की, ‘कलम ३७० बाबत घेतलेला निर्णय हा दहशतवादमुक्त देशाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल आहे. बऱ्याचकाळापासून मी या गोष्टीवर भर देतं होते. मोदी हे अशक्य असलेल्या गोष्टी करू शकतात. ते फक्त स्वप्रदर्शी नाहीत तर ते कल्पना पलीकडील गोष्टी घडवून आणण्यासाठी त्यांच्यात धैर्य आहे. जम्मू-काश्मीरसह संपूर्ण भारत या ऐतिहासिक दिवसाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते. आपण एकत्र खूप उज्ज्वल भविष्य पाहत आहोत.’

लेखक चेतन भगत यांनी देखील टि्वटर या निर्णयाबद्दल ट्विट केलं आहे. ‘मला हे ५ वर्षापूर्वी वाटतं होतं, शेवटी ते झालं. एक देश एक प्रणाली. ५ ऑगस्ट २०१९ ला काश्मीर मुक्त झाला. त्यांची प्रगती करण्यासाठी तसेच भविष्य घडविण्यासाठी काश्मीर आता मुक्त झालं आहेत.

‘हा ऐतिहासिक असा क्षण आहे. कलम ३७० बद्दल घेतलेला निर्णया हा खूप धाडसी पाऊल आहे,’ असे दिग्दर्शक मधुर भांडारकरने ट्विट केलं आहे.

तसेच परेश रावल यांनी एक जुना फोटो शेअर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केलं आहे. ‘सौ सौ सलाम आपको!’