‘एवेंजर्स एंडगेम’च्या हॉलिवूड अभिनेत्याने का ठेवले मुलीचे नाव ‘इंडिया’?

हॉलिवूड अभिनेता क्रिस हॅमस्वर्थ हा १४ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या मेन इन ब्लॅक या चित्रपटात दिसणार

Mumbai

क्रिस हॅमस्वर्थ या हॉलिवूड अभिनेत्याचा नुकताच ‘एवेंजर्स एंडगेम’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्याने सर्वच चाहत्यांचे प्रेम या अभिनेत्याह चित्रपटाला मिळाले. ‘एवेंजर्स एंडगेम’ मध्ये थॉरच्या भूमिका साकारून लोकप्रिय झालेला हॉलिवूड अभिनेता क्रिस हॅमस्वर्थ हा १४ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या मेन इन ब्लॅक या चित्रपटात दिसणार आहे.

ऑस्ट्रेलियन अभिनेता क्रिस हॅमस्वर्थ त्याच्या चित्रपटामुळेच चर्चेत आला नसून त्याने आपल्या मुलीचे नाव इंडिया ठेवल्याने सध्या त्याच्याच नावाची चर्चा होताना दिसतेय. क्रिस हॅमस्वर्थने आपल्या मुलीचे नाव इंडिया ठेऊन आपल्या मनात भारत देशाला वेगळेच स्थान दिले आहे. नुकत्याच एका मुलाखतीत क्रिसने आपल्या मुलीचे नाव इंडिया ठेवण्यामागचा खुलासा केला आहे.

भारतात केली वेबसिरीजची शुटिंग

मागच्या वर्षात हॅमस्वर्थ नेटफ्लिक्सच्या थ्रीलर वेबसिरीज ढाकाच्या चित्रीकरणासाठी क्रिस भारतात आला होता. त्यावेळी अहमदाबाद व मुंबईत चित्रीकरण केले होते. मुलाखतीत क्रिसने पुढे सांगितले की, फक्त माझ्या पत्नीलाच नव्हे तर मला देखील भारत देश आवडतो. भारतात शूट करण्याचा अनुभव भयावह होता पण मजेशीर होता. मला शूट दरम्यान रॉकस्टारसारखे वाटले.

म्हणून मुलीचे नाव ‘इंडिया’

यासोबतच, मुलाखतीत क्रिसने त्याच्या मुलीचे नाव इंडिया ठेवण्यामागचा खुलासा केला. इंडिया नाव ठेवण्यामागचे कारण त्याची पत्नी एल्सा पातकी असल्याचे सांगितले. त्याने असे देखील सांगितले की, माझ्या पत्नीने बराच कालावधी भारतात घालवला आहे आणि त्याच कारणामुळे मी माझ्या मुलीचे नाव इंडिया ठेवल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here