आयुष्मानच्या विनोदी ‘बाला’चा ऑफिशिअल ट्रेलर रिलीज

या चित्रपटामध्ये आयुष्मान केस गळतीच्या समस्येशी सामना करताना दिसणार

Mumbai

बॉलिवूडचा अभिनेता आयुष्मान खुरानाचा ड्रिम गर्ल या चित्रपटाने प्रेक्षकांचे चांगलेच कौतुक केले. तसेच तो चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरला होता. या चित्रपटानंतर आयुष्मान पुन्हा एकदा भन्नाट विनोदी चित्रपटात आपली वेगळी भूमिका साकरताना दिसणार आहे. हा चित्रपट म्हणजे ‘बाला’. आयुष्मानचा आगामी चित्रपट ‘बाला’चा ऑफिशिअल ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरला प्रक्षेकांचा चांगला प्रतिसाद दिला असून आयुष्मान खुरानानं पुन्हा एकदा जबरदस्त धमाका केल्याचे दिसतेय.

या चित्रपटामध्ये आयुष्मान केस गळतीच्या समस्येशी सामना करताना दिसणार आहे. पण या गंभीर समस्येमध्ये ज्याप्रकारे कॉमेडीचा वापर करण्यात आला आहे तो अंदाज सर्व प्रेक्षकांना हा ट्रेलर बघूनच आवडेल यात शंका नाही.

या चित्रपटात आयुष्यमान खुराना मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय या चित्रपटात भूमि पेडणेकर, यामी गौतम, सीमा भार्गव, अभिनेता सौरभ शुक्ला आणि मनोज पहवा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका दिसणार आहे. अमर कौशिक दिग्दर्शित हा चित्रपट ७ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.