घरट्रेंडिंग'या' व्यक्तीमुळे स्टेशनवर गाणारी रानू मंडाल बनली बॉलिवूड गायिका

‘या’ व्यक्तीमुळे स्टेशनवर गाणारी रानू मंडाल बनली बॉलिवूड गायिका

Subscribe

एका व्हिडिओमुळे रानूचे संपुर्ण आयुष्य वेगळ्याच वळणावर

असे म्हटले जाते की, कोणाचे भाग्य कधी उजळेल हे काही सांगता येत नाही. हे वाक्य प्रत्यक्षात खरं झालंय स्टेशनवर गाणाऱ्या रानू मंडाल या महिलेच्या बाबतीत…रेल्वे स्टेशनवर गात-गात रानू बॉलिवूडच्या गायकांपर्यंत पोहचली आहे. रानू मंडाल हिचे आयुष्य एका क्षणात बदलले ती रस्त्यावरून थेट बॉलिवूडच्या स्टुडिओपर्यंत पोहोचली.

New Films " Happy Hardy and Heer"Singing titale song by ranu mandol and himesh reshmiya.especali thanx to himeshji

Atindra Chakraborty ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 22, 2019

- Advertisement -

रानूने सोशल मीडियावर सगळ्यांनाच आपल्या आवाजाची मोहिनी घातली आहे. यामुळेच इंटरनेटवर युजर्सना रानूने आपला वेगळा असा चाहता वर्ग निर्माण केला आहे. बॉलिवूडचा दिग्गज संगीतकार व गायक हिमेश रेशमियाने आपल्या आगामी चित्रपटात संधी दिली आहे. परंतु, हिमेश हा पहिला व्यक्ती आहे की, रानूच्या आयुष्यातील एक देवदूत ठरला आहे. मात्र, सगळी किमया साधली ती तिच्या एका व्हिडीओने. पण हा व्हिडिओ रेकॉर्ड करणारा व्यक्ती होता तरी कोण?

‘रानू’च्या आयुष्यात ‘देवदूत’ बनली ‘ही’ व्यक्ती

रस्त्यावर गात असतानाचा तिचा व्हिडिओ एका व्यक्तिने सोशल मीडियावर टाकला. तो व्हायरल झाला आणि रानूच्या नशीबाला एक प्रकारे कलाटणीच मिळाली. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करणा-या त्या व्यक्तीला रानू कधीच विसरू शकणार नाही. तिच्या आयुष्यात ‘देवदूत’ बनून आलेली ही व्यक्ती नेमकी कोण? यावंर अनेक चर्चा सुरू असून तसे वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात होते.

- Advertisement -

मात्र या गोष्टीचा अखेर उलगडा झाला आहे. या व्यक्तीचे नाव आहे, एतींद्र चक्रवर्ती. याव्य़क्तीने रानूचा व्हिडिओ आपल्या फेसबूकवर शेअर केला. त्याला चांगलीच पसंती मिळत हा व्हिडिओ बऱ्याच लोकांनी व्हायरल केल्याने आज रानू हिमेश रेशमियासह एक नवं गाणं रेकॉर्ड करत आहे.

कोण आहे ही रानू मंडाल?

पश्चिम बंगालच्या रानाघाट स्टेशनवर रानू मंडाल ही महिला गाणी गात स्वत:च पोट भरत असायची. तिच्या मधूर आवाजाने अनेकांवर तिने जादूच केली आहे. यावेळी काहींनी फक्त तिचे कौतुक केले तर काहींनी तिच्या हातावर पैसे टाकले. मात्र एतींद्र चक्रवर्तीने एके दिवशी गाणाऱ्या रानूला बघताच तिच्या गाण्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला.यावेळी रानूलता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा’ हे गीत गात होती. एतींद्रने तिचा व्हिडिओ बनवला आणि आपल्या सोशल मीडियावर शेअर केला. तो इतका व्हायरल झाला की, या एका व्हिडिओमुळे रानूचे संपुर्ण आयुष्य वेगळ्याच वळणावर नेऊन पोहोचवले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -