Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी अर्शी खानच्या भावाने राखीला केलं प्रपोज, राखीने दिलं 'हे' उत्तर

अर्शी खानच्या भावाने राखीला केलं प्रपोज, राखीने दिलं ‘हे’ उत्तर

अर्शी खानच्या भावाने बिग बॉसच्या घरातील सदस्यांच्या चेहऱ्यावर आणले हसू

Related Story

- Advertisement -

कलर्स वाहिनीवर Reality शो बिग बॉसमध्ये अलीकडेच घरातील सदस्यांचे कुटुंबातील लोकं भेटायला आले होते. ज्यामुळे बिग बॉसच्या घरातील सदस्य खूप इमोशनल झाले होते. पण यादरम्यान अर्शी खानच्या भावाने घरातील वातावरण बदलले. अर्शी खान बिग बॉसच्या शो मधील सर्वाधिक चर्चेत असलेली सदस्य आहे. यामध्ये अर्शीचा भाऊ देखील कमी पडला नाही आहे. अर्शी खानच्या भावाने बिग बॉसच्या घरात खूप धमाला केली.

बिग बॉसच्या घरातील सदस्यांना आणि अर्शीला भेटण्यासाठी भाऊ फरहान खान आला होता. अर्शी ज्याप्रकारे बिग बॉसच्या घरातील सदस्यांचे मनोरंजन करते त्याप्रमाणे तिच्या भावाने देखील घरातील सदस्यांच्या चेहऱ्यावर हसू आणले. अर्शीचा भाऊ फरहान खानचा बोलण्याचा अंदाज घरातील सदस्यांना खूप आवडला. बिग बॉसच्या घरातील सदस्यांसोबत फरहान खानने खूप मस्ती केली. एवढेच नाहीतर अर्शीचा भावाने यादरम्यान राखी सावंत खूप आवडत असल्याचा खुलासा केला.

- Advertisement -

अर्शी खानसोबत फोनवर बोलताना फरहान म्हणाला की, ‘मला राखी सावंत खूप आवडते. जर तिचे लग्न झाले नसते तर मी तिला प्रपोज केले असते.’ हे ऐकून अर्शी खान म्हणते की, ‘तू स्वतः राखी सावंतला हे सांग.’ यानंतर अर्शी खानचा भाऊ ओरडत राखील सावंतला ‘आय लव्ह यू’ बोलतो आणि राखी देखील त्याला ‘आय लव्ह यू टू’ असे उत्तर देते. यादरम्यान अर्शी खानचा भाऊ राखी सावंतचे खूप कौतुक करतो.


हेही वाचा – Good News! विरुष्काला झाले कन्यारत्न


- Advertisement -

 

- Advertisement -