‘बाबा का ढाबा’ नंतर भजीवाली अम्मा व्हायरल, रवीना टंडनने केली मदतीची मागणी

bollywood actor raveena tandon shares video of woman selling pakora after baba ka dhaba for help
'बाबा का ढाबा' नंतर भजीवाली अम्मा व्हायरल, रवीना टंडनने केली मदतीची मागणी

‘बाबा का ढाबा’चा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ढाब्याच्या मालकाचं नशीबचं बदलून गेलं. अनेक ठिकाणांहून लोकं ‘बाबा का ढाबा’ आणि त्याच्या मालकाला मदत करण्यासाठी तिथे पोहोचले. ‘बाबा का ढाबा’नंतर आता आसामच्या एका वृद्ध महिलेचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमधील महिला ३० वर्षांपासून भजी विकत आहे. हा व्हिडिओ एका व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेत्री रवीना टंडन हिने हा व्हिडिओ रिट्विट करत मदतीची मागणी केली आहे. रवीना टंडनने शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून त्याच्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

रवीना टंडनने रिट्विट केलेल्या या व्हिडिओमध्ये महिला रस्त्याच्या कडेला बसून भजी तयार करताना दिसत आहे. हा महिलेचा व्हिडिओ शेअर केलेल्या व्यक्तीने सांगितलं आहे की, ‘ती जवळपास ३० वर्षांपासून तिथे भजी तयार करून विकत आहोत. ही महिला आसाममधील डुबरी येथील संतोषी मातेच्या मंदिराच्या बाहेर भजी विकते. हा व्हिडिओ जास्तीत शेअर करा, जेणेकरून तिला मदत होऊ शकेल.’ रवीन टंडनने हा व्हिडिओ रिट्विट करत लिहिलं आहे की, ‘कृपया त्यांना थोडी मदत करा.’

दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी ती नेहमी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. रवीना टंडन लवकरच केजीएफ चॅप्टर २ मध्ये दिसणार आहे. तसेच ती डिजिटल माध्यमावर पदार्पण करणार आहे.


हेही वाचा – रवीना टंडन डिजिटल माध्यमात पदार्पण करणार