लग्न लपवता येते प्रेग्नेंसी नाही – अनुष्का

मी सध्या माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करत आहे. मला सध्या इतर कोणत्याही गोष्टीसाठी वेळ नाही. काही वर्ष मी करिअरवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे अनुष्काने सांगितले.

Mumbai
anushka sharma
अनुष्का शर्मा

अभिनेत्री अनुष्का शर्माने अखेर प्रेग्नेन्सिवर मौन सोडले आहे. गेल्या काही दिवसापासून अनुष्का शर्मा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अनुष्काच्या आगामी ‘झिरो’ चित्रपटाच्या प्रमोशनावेळी तिला गुज न्यूज बद्दल विचारण्यात आले. दरम्यान अनुष्काने प्रेग्नेंट असल्याची बातमी फेटाळली आहे. ‘ मला माहित नाही या बातम्या कुठून येतात पण मी प्रेग्नेंट असल्याच्या फक्त अफवा आहेत. आपण लग्न लपवू शकतो मात्र प्रेग्नेंसी लपवू शकत नसल्याचे अनुष्काने सांगितले. अशा अनेक अफवांचा अभिनेत्रींना सामना करावा लागतो. मात्र माझ्यासाठी या अफवा महत्त्वाच्या नाहीत. इथे तर लोकं लग्नाच्या आधीच लग्न करुन टाकतात. तर प्रेग्नेंट होण्याच्या आधीच आई बनवून टाकतात. मला याचा काहीच फरक पडत नाही. अशा बातम्या ऐकल्यावर मला हसायला येत असल्याचे अनुष्काने सांगितले.

सध्या कामावर लक्ष केंद्रीत करतेय

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघंही गेल्याच वर्षांत विवाहबंधनात अडकले. या दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत नाही तेवढ्यात अनुष्का गर्भवती असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, मी सध्या माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करत आहे. मला सध्या इतर कोणत्याही गोष्टीसाठी वेळ नाही. काही वर्ष मी करिअरवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे अनुष्काने सांगितले. तसेच विराट आणि मी लग्नानंतर काही लगेच कामाला सुरुवात केली. आमच्या दोघांचंही वेळापत्रक खूपच व्यग्र असतं त्यामुळे आम्हाला एकमेकांना म्हणावं तेवढा वेळही देता येत नाही असेही अनुष्काने सांगितले.

२१ डिसेंबरला होणार रिलीज

‘झिरो’ चित्रपटानंतर कोणताही चित्रपट साइन न करण्यावरुन अनुष्का प्रेग्नेंट असल्याच्या अफवा समोर आल्या होत्या. मात्र या चर्चेला अनुष्कानेच ब्रेक लावला आहे. जर अनुष्काच या बातम्यांना पूर्णविराम देत असेल तर ही चर्चा इथेच संपते. अनुष्का शर्मा लवकरच शाहरुख खानच्या झिरो या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये अनुष्काने एका विकलांग मुलीची भूमिका केली आहे. शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कटरीना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या झिरो चित्रपट येत्या २१ डिसेंबरला रिलीज होत आहे.

हेही वाचा – 

मॅडम तुसादमध्ये अनुष्का शर्माचाही मेणाचा पुतळा

‘या’ चित्रपटासाठी अनुष्का शिकली पोळ्या बनवायला!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here