Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कॉमेडियन कपिल शर्माने चाहत्यांना दिली खुशखबर

कॉमेडियन कपिल शर्माने चाहत्यांना दिली खुशखबर

आता कॉमेडियन कपिल शर्माचे ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे.

Related Story

- Advertisement -

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कॉमेडियन कपिल शर्माने आपल्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. कपिल शर्मा पुन्हा प्रेक्षकांना हसवण्यासाठी येणार आहे. पण तो टेलिव्हिजनच्या माध्यमातून येणार नसून ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. देशातील लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पदार्पण करणार आहे.

आता कपिल लवकरच नेटफ्लिक्सवर आपल्या अनोख्या अंदाजात जगातील १९० देशांतील लोकांना हसवताना दिसणार आहे. नेटफ्लिक्सने कपिलचा एन अनाउंटमेंट व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंट आणि युट्यूबवर शेअर केला आहे. यामध्ये कपिल शर्मा इंग्रजीतला एक शब्द बोलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, पण तो बोलू शकत नाही आहे. शेवटी कपिलचा कॅमेरामॅन त्याला म्हणतो की, ‘तु हिंदीमध्ये बोलू शकतोस. ‘ यानंतर कपिल शर्मा हिंदीतच बोलतो.

- Advertisement -

कपिल शर्माने ओटीटी प्लॅटफॉर्मवरील पदार्पणाबाबत म्हणाला की, ‘मी नेटफ्लिक्ससोबतच्या पहिल्या प्रोजेक्टसाठी खूप उत्सुक आहे. २०२० जगभरातील सर्वांसाठी एक कठीण काळ होता. त्यामुळे लोकांना त्यांच्या चिंता विसरण्यासाठी, प्रेम, हसणे आणि सकारात्मतेने नवीन वर्षाची सुरुवात करावी, असा माझा हेतू आहे. मी नेहमीच नेटफ्लिक्सवर येण्यास इच्छूक होतो, पण माझ्याजवळ त्यांच्या नंबर नव्हता. हा माझा खूप जवळचा प्रोजेक्ट आहे आणि मी लवकरच याबाबतची अधिक माहिती माझ्या चाहत्यांसोबत शेअर करेल.’


हेही वाचा – उर्मिलानंतर आता आशा भोसले यांचे इंन्स्टाग्राम अकाउंट हॅक


- Advertisement -

 

- Advertisement -