घरमनोरंजनराजेश-रेशमविरोधात नाशिकमध्ये तक्रार, 'बिग बॉस'मध्ये अश्लील वर्तन

राजेश-रेशमविरोधात नाशिकमध्ये तक्रार, ‘बिग बॉस’मध्ये अश्लील वर्तन

Subscribe

बिग बॉसने आपला असा प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. त्यामुळे मराठी बिग बॉसमध्ये नक्की काय असणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र सध्या हा शो वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बिग बॉसमधील सर्वच स्पर्धकांनी प्रेक्षकांमध्ये एक हवा निर्माण केली आहे. मात्र राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांच्यातील नात्यामुळे बिग बॉस वादाच्या भोवऱ्यात सापडणार आहे. नाशिकमधील एनबीटी विधी महाविद्यालयात शिकणार्‍या ऋषिकेश बळवंत देशमुख यांनी सर्व संचालकांसह रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरे यांच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

राजेश शृंगारपुरे अज्ञातवासातून परत आल्यानंतर रेशमबरोबरची त्याची वागणूक मर्यादेचे उल्लंघन करण्याऱ्या आहेत असं या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या दोघांचेही एकमेकांबरोबरील संवाद आणि वर्तन हे आक्षेपार्ह आहे. त्यांच्या वागण्यातून अश्लील वर्तन दिसून येत असून या चित्रफिती कलर्स मराठीवर दाखविण्यात येत आहेत. त्यामुळे संबंधित चित्रफितीची चौकशी करण्यात यावी असे आपल्या तक्रारीमध्ये ऋषिकेश यांनी नमूद केले आहे. ऋषिकेश देशमुख सध्या कायद्याचं शिक्षण घेत असून घरातील लोकांबरोबर हा कार्यक्रम बघणे शक्य नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या अशोभनीय व अश्‍लील कृतीमुळे अतिशय लज्जास्पद भावना निर्माण झाल्या आहेत. अशाप्रकारची दृश्य आपल्या संस्कृतीला काळीमा फासणार्‍या असून, संबंधितांवर याबाबत कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे ऋषिकेशने केली आहे.

- Advertisement -

सध्या बिग बॉसमध्ये राजेश आणि रेशम एकाच बेडवर एकाच रजईमध्ये झोपत आहेत. घरातही दुसऱ्या गटामध्ये त्यांच्या अशा वागण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या तक्रारीनंतर आता पुढे कोणती कारवाई घेण्यात येईल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -