घरमनोरंजन#HappyBirthdayDoordarshan : डीडीबाबतच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का!

#HappyBirthdayDoordarshan : डीडीबाबतच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का!

Subscribe

इडियट बॉक्स म्हणवल्या जाणाऱ्या टेलिव्हीजन म्हणजेच टीव्हीवर सधाय हजारो चॅनेल्सची गर्दी पाहालया मिळते. मात्र एक काळ असा होता, जेव्हा एक किंवा दोन मोजके चॅनेल्स अस्तित्वात होते. ते म्हणजे दूरदर्शन. सरकारी प्रसारक म्हणून दूरदर्शनची स्थापना आजच्याच दिवशी, १५ सप्टेंबर १९५९ रोजी करण्यात आली होती. आज डीडीचा ६० वा वाढदिवस आहे. इतर खासगी वाहिन्यांची गर्दी होण्यापूर्वी चार दशकाहून अधिक काळ डीडीने स्वतःची अस्तित्व टिकण्यात आणि प्रेक्षकांची मने जिंकण्यात यश मिळवले आहे. आता या दूरदर्शनचे विविध भाषेत चॅनेल्स उपलब्ध आहेत. दूरदर्शनची ६० वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने आपण त्याच्याबाबतच्या काही खास गोष्टी जाणून घेऊया.

हे तुम्हाला माहिती आहे का –

  • दृकश्राव्य माध्यमातून प्रेक्षकांना मनोरंजन मिळू लागले. ज्याच्या घरात टीव्ही त्याच्या घरामध्ये लोकांनी गर्दी जमू लागली.
  • इमारत किंवा घराच्या टेरेसवर लागलेला टेलिव्हिजनचा अँटिना प्रतिष्ठेचा मानला जात असे.
  • सुरुवातील ठराविक वेळेतच कार्यक्रमाचे प्रसारण होत होते. नंतर ते नियमित करण्यात आले.
  • १९६५ साली सुरु झालेल्या ऑल इंडिया रेडिओच्या माध्यमातून नियमित प्रसारणाची सुरुवात झाली.
  • १९७२ साली ही सेवा मुंबई आणि अमृतसर या शहरांपर्यंत विस्तारीत करण्यात आली.
  • १९८२ साली दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणाची सुरुवात झाली. याच वर्षात डीडीचे रंगीत रुप पाहायला मिळाले. त्यापूर्वी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये डीड दिसत होता.
  • डीडीचे ५ राष्ट्रीय चॅनेल्स आहेत
  • एकूण ११ भाषांमध्ये दूरदर्शनचे चॅनेल्स उपलब्ध आहेत.
  • दूरदर्शनचा तो लोकप्रिय लोगो एनआयडीचे माजी विद्यार्थी देवाशीष भट्टाचार्य यांनी त्याच्या ८ मित्रांसह बनवला होता.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -