इभ्रत चित्रपटाच्या कथेवरून वाद, चित्रपटाचं प्रदर्शन रोखलं!

Mumbai

आण्णाभाऊ साठे यांच्या आवडी या कथेवर बेतलेला ‘इभ्रत’ हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित होणार होता. पण या कथेच्या हक्कांवरुन नव्याने वाद उद्भवला आहे. आता हा वाद कोर्टातत गेला आहे. प्रवीण क्षीरसागर दिग्दर्शित या चित्रपटात संजय शेजवल आणि शिल्पा ठाकरे यांच्या मुख्य भुमिका आहेत. सध्या चित्रपटाचं प्रमोशनही महाराष्ट्रभर जोरदार सुरू आहे. पण कथेच्या हक्कांवरून सतीश वाघेला यांनी या सिनेमाच्या निर्मात्यांना कोर्टात खेचलं आहे. या वादाबाबत 21 तारखेला कोर्टत सुनावणी होणार आहे. त्यामुळे या शुक्रवारी म्हणजे 21 फेब्रुवारीला असलेलं या सिनेमाचं प्रदर्शन आता पुढे ढकलण्यात येणार आहे.
संजय वाघेला यांनी ‘आवडी’ या कथेचे हक्क आण्णाभाऊ यांच्या सून सावित्रीमार्ई साठे यांनी त्यांना दिले आहेत. तर ‘इभ्रत’ च्या निर्मात्यांचा मात्र हे हक्क आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे.

 

हा वाद आता यायाचं कारण नव्हतं. आमच्या निर्मात्याकडे या सिनेमाचे हक्क आहेत. सावित्री यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. असं असताना वाघेला यांनी या कथेचे हक्क आपल्याकडे असल्याचं सांगणं अनाकलनीय आहे. सावित्री यांनी त्यांनाही एका कथेचे हक्क दिले आहेत पण ती कथा वेगळी आहे. असो. सध्या हे प्रकरण कोर्टात असल्यामुळे कोर्ट या सर्व प्रकाराची शहानिशा करुन निर्णय देईल.”
– प्रवीण क्षीरसागर, दिग्दर्शक

 

आम्ही केलेली मेहनत, आमचं काम सगळ्यांसमोर येऊ नये म्हणून काहीजण जाणूनबूजून हा प्रयत्न करत आहेत. या चित्रपटाचे हक्क त्यांच्याकडे आहेत असं त्यांच म्हणणं आहे. पण माईताई साठे या आमच्या पाठिशी आहेत. दोन महिने आधीच आम्ही चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. मात्र आता अचानक ही केस का करण्यात आली या मागचं नेमकं कारण मला समजलं नाही.
– संजय शेजवल, अभिनेता

या कोर्टातल्या वादामुळे निर्मात्यांना निष्कारण २५ ते ३० लाखांचं नुकसान झाल्याचा दावा दिग्दर्शकांनी केला आहे. सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी सिनेमा वितरकांना पैसे द्यावे लागतात. तरच सिनेमा वितरित होऊ शकतो. सिनेमा पुढे गेल्याने आता पुढे जेव्हा सिनेमाची तारीख ठरेल तेव्हा पुन्हा हा खर्च करावा लागणार आहे.