कंगना रणौत बॉलिवुडवर नाराज

अभिनेत्री कंगना रणौत हिने सध्या बॉलिवुड कलाकारांवर नाराजी व्यक्त केली आहे. कंगणाच्या या तक्रारीनंतर अनुपम खेर यांनी कंगनाचे कौतुक केले आहे.

Mumbai
Kangana-Ranaut-Manikarnika
कंगना रणौत

बॉलिवुडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना रणौत हिचा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हा  चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. कंगनाने या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. परंतु कंगनाच्या कामगिरीबद्दल बॉलिवुडच्या एकाही कलाकाराने दखल घेतली नाही किंवा तिच्या आंनदात सहभागी  झाले नाहीत. त्यामुळे कंगनाने आता बॉलिवुडवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘माझ्या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी कोणताच कलाकार आला नाही. कोणत्याच कलाकाराने कौतुकाचे दोन शब्दसुद्धा बोलून दाखवले नाही. सगळे जण माझ्या विरोधात प्लॅनिंग प्लॉटिंग करत आहे. केवळ मी लैंगिकता, असमानता यावर भाष्य केल्यामुळे हे सगळे माझ्या विरोधात आहेत’. ‘आलिया ही करण जोहरच्या हातचे कळसूत्री बाहुली आहे, कुणाच्या हातचे कठसूत्री बाहुली असलेली व्यक्ती कधीच यशस्वी असू शकत नाही, अशी टिका कंगनाने आलिया भटवर ही केली आहे.

अनुपम खेर यांनी केले कंगणाचे कौतुक 

या सर्व प्रकारानंतर जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी कंगनाची पाठराखण केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर कंगणाचं आणि मणिकर्णिका या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. ‘कंगणाच खरी रॉकस्टार आहे’, असं त्यांनी म्हटलं आहे. अनुपम खेर यांनी चाहत्यांसोबत ट्विटरवर संवाद साधला. यावेळी ते म्हणाले ‘कंगना खरी रॉकस्टार आहे. कंगना धाडसी अभिनेत्री आहे. तिची कामगिरी प्रशंसात्मक आहे. तशीच ती एक महिला सबलीकरणाचं उत्तम उदाहरण आहे’, असं अनुपम खेर म्हणाले.

अंकिता लोखंडेचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

कंगनाने मणिकर्णिका या सिनेमामध्ये झाशीचा राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारली आहे, तसेच अंकिता लोखंडे हिने या चित्रपटातून बॉलिवुडमध्ये पदार्पण केले असून झलकारी बाईंची भूमिका साकारली आहे. चित्रपटात वैभव तत्ववादीने झलकारी बाईच्या म्हणजे (अंकिता लोखंडे) नवऱ्याची भूमिका साकारली असून लक्ष्मीबाई यांच्या सैन्यातील शूरवीर योद्धा पूरणसिंग यांच्या भूमिकेत तो दिसला आहे.