Coronavirus: कनिकाच्या संपर्कात आले होते १६२ जण, आतापर्यंत ६३ जणांचे आले रिपोर्ट

Mumbai
kanika kapoor 162 people came in contact with singer 63 people coronavirus covid 19 test negative
Coronavirus: कनिकाच्या संपर्कात आले होते १६२ जण, आतापर्यंत ६३ जणांचे आले रिपोर्ट

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला करोना व्हायरसची लागण झाली आहे. सध्या तिच्यावर संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे उपचार सुरू आहेत. कनिका लंडनहून परतली होती. मीडियाच्या माहितीनुसार, कनिका कपूरला करोनाची लक्षणे असून सुद्धा तिने एका हॉटेलमध्ये डिनर पार्टी आयोजित केली. यामुळे सध्या तिला नेटकरी चांगलेच ट्रोल करत आहेत. पिंकविलाच्या माहितीनुसार, आरोग्य विभागाने कनिका कपूरच्या संपर्कात १६२ लोक होते, असं उघडकीस आलं आहे.

माहितीनुसार, कनिकाच्या संपर्कात आलेल्या १२० ते १३० जणांची ओळख पटली असून त्याचे चाचणी करण्यात आली आहे. कनिकाच्या पार्टीत उपस्थित असलेल्या १६२ लोकांपैकी ३५ जण कानपुरचे होते. आरोग्य विभागाचे अधिकारी या सर्वांचा शोध घेत आहेत. आतापर्यंत सुमारे ६३ लोकांचे करोना चाचणी करण्यात आली आहे. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अशी माहिती देखील समोर देत आहे की, कनिका कपूरला ज्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. तिथेच भारतीय संघासोबत वनडे मालिका खेळण्यासाठी आलेली दक्षिण आफ्रिकेचा संघ देखील होता. मात्र याबाबत बीसीसीआयने अद्याप काहीही सांगितलं नाही आहे.

कनिका कपूरने करोना लागण झालेल्याबाबत बेजबाबदारपणा केल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये तिच्या विरोधात तीन एफआयआर दाखल झाले आहे. कनिका कपूर हिचा जन्म भारतात झाला होता. पण ती आता लंडन राहत होती. कनिका जेव्हा १८ वर्षांची होती तेव्हा तिचे एनआरआय बिझनेसमॅन राज चंडोलासोबत लग्न झालं. तिला तीन मुलं आहेत. मात्र तिचा २०१२ मध्ये घटस्फोट झाला. कनिका कपूर हिने अनेक बॉलिवूड आणि पंजबी गाणी गायली आहेत.


हेही वाचा – Coronavirus: कनिकाच्या पार्टीमधल्या दोघांची टेस्ट आली निगेटिव्ह