‘लव आज कल’ या चित्रपटाचा पोस्टर रिलीज

सैफ आणि दीपिकाचा 'लव आज कल' या चित्रपटाचा सिक्वल १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

Mumbai
love aaj kal poster release sara ali khan and kartik aaryan film
'लव आज कल' या चित्रपटाचा पोस्टर रिलीज

नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या ‘लव आज कल’ या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. या दोघांचे चाहते बऱ्याच काळापासून या चित्रपटाची प्रतिक्षा करत होते. मात्र पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. ‘लव आज कल’ या पोस्टरमध्ये सारा अली खान आणि कार्तिक आर्यनची जोडी जबरदस्त दिसत आहे. चाहते या पोस्टर चांगला प्रतिसाद देत आहे. पहिल्यांदा या नव्या जोडीला एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहे.

या पोस्टरमध्ये कार्तिक आर्यन झोपलेला दिसत आहे तर सारा नाराज असल्याचं दिसत आहे. ‘लव आज कल’ या चित्रपटाचे पोस्टर सारा आणि कार्तिक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या पोस्टरवर चाहते खूप प्रतिसाद देत आहेत.

सारा आणि कार्तिक हा चित्रपट १४ फेब्रुवारी म्हणजेच ‘व्हेलेंटाईन डे’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सारा आणि कार्तिक व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. रोमँटिक ड्रामा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अली याने केलं आहे. सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणचा ‘लव आज कल’ या चित्रपटाचा सिक्वल आहे.


हेही वाचा – कपिलच्या फोटोवर कमेंट करणाऱ्या रणवीरला चाहत्यांनी केलं ट्रोल!