घरमनोरंजनप्रतिकने घेतलं 'या' भुमिकेचं जजमेंट

प्रतिकने घेतलं ‘या’ भुमिकेचं जजमेंट

Subscribe

लवकरच ऋण कादंबरीवर आधारीत ऋण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तेजश्री प्रधान, मंगेश देसाई, माधव अभ्यंकर यांच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटात अभिनेता प्रतिक देशमुख एका वेगळ्या भुमिकेत दिसणार आहे.

‘शुभ लग्न सावधान’ सिनेमामधून एनआरआय रोहनच्या भूमिकेत दिसलेला चॉकलेट हिरो प्रतिक देशमुख आता आपल्या आगामी सिनेमात वेगळ्याच लूकमधून दिसणार आहे. आगामी ‘जजमेंट’ सिनेमात तो यदुनाथ साटम ह्या नैराश्यग्रस्त तरूणाच्या भूमिकेत दिसेल.

आपली पहिली फिल्म ‘शुभलग्न सावधान’ करतानाच प्रतिक देशमुखला जजमेंट फिल्मची ऑफर मिळाली. ह्याविषयी प्रतिक देशमुख सांगतो, “रोहन आणि यदुनाथ दोघेही अमेरिकेतून शिक्षण घेऊन भारतात परतलेले तरूण आहेत. एवढंच त्यांच्यातलं साम्य. बाकी कौटुंबिक, मानसिक, आर्थिक पातळीवर दोन्हीही भूमिका खूप वेगळ्या धाटणीच्या आहेत. शुभलग्न मधला रोहन खूप फंकी होता. रोहन खूप एनर्जेटिक, बबली आणि हॅपी गो लकी मुलगा होता. ‘शुभलग्न’चा रोहन काहीसा बहिर्मुख तर ‘जजमेंट’मधला यदुनाथ अतिशय अंतर्मुख मुलगा आहे. “

- Advertisement -

अभिनेता प्रतिक देशमुख आपल्या भूमिकेच्या तयारीविषयी सांगतो, “शुभलग्नचा रोहन सुखवस्तू मुलगा होता. पण यदुनाथची मानसिक अवस्था पाहता त्याला बारीक असणे गरजेचे होते. त्यामूळे ‘शुभलग्न’ संपल्यावर लगेच मला वजन कमी करावे लागले. केसही आता मोठे आणि फंकी चालणार नव्हते. त्यामूळे व्यवस्थित भांग पाडणारा, क्लीन शेव असलेला यदुनाथ मी उभा केला.” “सर्वसाधारणपणे आपल्या करीयरच्या सुरूवातीला नवोदित अभिनेत्यांना कॉलेज गोइंग तरूणांच्या भूमिका मिळतात. मात्र मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, ‘शुभलग्न’चा रोहन पाहून मला ‘जजमेंट’च्या फिल्ममेकर्सनी यदुनाथची भूमिका ऑफर केली.”

लवकरच ऋण कादंबरीवर आधारीत जजमेंट हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे याला ऋण कादंबरी खूप भावली आणि यातून ‘जजमेंट’ या चित्रपटाने आकार घेतला. तेजश्री प्रधान, मंगेश देसाई, माधव अभ्यंकर यांच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -