घरमनोरंजनरिलीज होण्याच्या काही तासातच 'मर्दीनी २' झाला लिक

रिलीज होण्याच्या काही तासातच ‘मर्दीनी २’ झाला लिक

Subscribe

राणी मुखर्जीचा 'मर्दानी २' हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. मात्र रिलीज होणयाच्या काही तासातच हा चित्रपट ऑनलाईन लिक केला गेला.

शिवानी शिवाजी रॉय या दमदार पोलिस अधीक्षकाच्या भूमिकेत राणी मुखर्जींनं, २०१४ मध्ये आलेल्या मर्दानी चित्रपटातून प्रेक्षकांचे मन जिंकले. रानी मुखर्जीला पुन्हा एकदा शिवानीच्या भूमिकेत पाहण्यास प्रेक्षक फार आतूर झाले होते. तर १३ डिसेंबर रोजी या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे ‘मर्दानी २’ हा रिलीज झाला. महिलेंवर सध्या मोठ्याप्रमाणात बलात्कार, हत्या आणि अत्याचाराच्या घटना घडत आहे आणि त्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे प्रक्षकांनी फार कौतुक केले, राणीनी केलेल्या कामाचे देखील कौतुक करण्यात आले. मात्र रिलीज होण्याच्या काही तासातच हा चित्रपट काही ऑनलाइन साईटवर लिक झाला.

- Advertisement -

चित्रपट लिक झाल्याचा फटका निर्मात्यांना कसा बसतो?

जेव्हा एखादा चित्रपट हा लिक होऊन ऑनलाईन उपलब्ध होतो तेव्हा चित्रपट निर्मात्यांसाठी ही गोष्ट फार वाईट ठरते.  चित्रपट ऑनलाईन उपलब्ध झाल्यामुळे प्रेक्षक चित्रपटगृहात न जाता या साईट्सवर विनामूल्य हे चित्रपट पाहतात. यामुळे चित्रपटाची टिकीट विक्रेती कमी होते ज्यामुळे चित्रपटाचे नुकसान होते. तामिळरोकर्स, फिल्मीवाप, ऑनलाइनमाव्ह्यूवेचेस, १२3 मॉव्हिज, १२३ मॉव्हिएरुलझ, फिलमीझिला या सगळ्या साईट्सवर हा चित्रपट एचडी प्रिंटमध्ये उपलब्ध आहे. शुक्रवारी हा चित्रपट रिलीज होऊन हा चित्रपट लिक देखील झालेला आहे, ही गोष्ट चित्रपटसृष्टीसाठी फार वाईट आहे.

ऑनलाईन हे चित्रपट उपलब्ध असल्यामुळे अनेक लोकं घरी बसून चित्रपट पाहण्यास प्राधान्य देतात मात्र काही चित्रपट प्रेमी हे चित्रपटगृहात आवर्जून जाऊन चित्रपट पाहतात. चित्रपटगृहात चित्रपट दाखवण्याआधी पायरसी करणे हे चूकीचे आहे असा संदेश दिला जातो मात्र तरीही या गोष्टी घडतात. यावर पुढे काही कठोर कारवाई केली जाणार की नाही हे मात्र वेळच सांगेल.


हेही वाचा: ‘राजा राणीची गं जोडी…’, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -