शोविकला ताब्यात घेणारा NCB चा अधिकारी आहे ‘या’ अभिनेत्रीचा पती!

Rhea- shouvik

सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्या प्रकरणी सुरू असलेल्या तपासात सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. तसेच या प्रकरणी आता ड्रग्स कनेक्शन देखील समोर आलं आहे. या NCB ने रियाचा भाऊ शौविक सामुयल मिरांडाला अटक केली आहे. एनसीबी टीमचे सुरु असेलेले तापसकार्य आयपीएस अधिकारी समीर वानखेडे करत आहेत. समीर वानखेडे हे मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीचे पती आहेत.

अभिनेत्रीचे क्रांती रेडकरचे पती समीर वानखेडे आहेत. २०१७ साली या दोघांचे ल्गन झाले. आता त्यांनी जुळी मुलं आहेत. क्रांतीने २००३मध्ये ‘गंगाजल’ चित्रपटात काम केले आहे. तसेच ‘कोंबडी पळाली’ गाण्यासह जत्रा, माझा नवरा तुझी बायको, फुल थ्री धमाल अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अनेक मोठ्या कामगिरी पार पाडल्या

२००४ बॅचचे समीर वानखेडे आयपीएस अधिकारी आहेत. समीर यांनी आत्तापर्यंत मोठ्या लोकांच्या घरी धाडी टाकल्या आहेत. त्यात अनेक बॉलिवूड स्टार्सही आहेत. यामध्ये विवेक ओरेरॉय, अनुराक कश्यप, रामगोपाल वर्मा, अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. २०१३मध्ये जेव्हा मिका सिंगला मुंबई विमानतळावर विदेशी करंसीसोबत पकडण्यात आले तेव्हा देखील समीर यांनी कारवाई केली होती.

आता सुशांत सिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी समीर यांचे तपासकार्य सुरु आहे. तपासासाठी टीम रियाच्या घरी पोहचले. तसेच त्यांची चौकशीही करण्यात आली. त्यानंतर एनसीबीची टीम आपल्यासोबत शोविकला घेऊन गेली. याप्रकरणी ड्रग्स कनेक्शनबाबत नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने शोविक सोबत अटक केलेल्या ड्रग पॅडलर बासित आणि झैद यांचीही चौकशी केली. सर्वांना एकत्र बसवून त्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहेत.


हे ही वाचा- सुशांतवर आधारीत चित्रपटात दिसणार आदित्य ठाकरेंशी साधार्म्य असणारं पात्र!